Crime News | छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) मधील जोगेश्वरी येथे 14 वर्षीय मुलीची छेड काढणाऱ्या टोळक्याने तिच्या कुटुंबीयांना अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. (Crime News)
जाब विचारला, तर लाकडी दांड्याने हल्ला
मुलीने तिच्या कुटुंबीयांना अश्लील हातवारे आणि पाठलागाचा प्रकार सांगितल्यानंतर, तिच्या आई-वडिलांनी आरोपींना जाब विचारण्यासाठी पुढाकार घेतला. मात्र, आरोपी निलेश दुबिले, ऋषिकेष दुबिले आणि प्रतीक राजपूत यांनी त्यांच्यावरच हल्ला केला.
पीडित महिलेच्या छातीवर लाथ आणि डोक्यात दगड मारला गेला. पीडितेच्या वडिलांना देखील लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली. मारहाण थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन नागरिकांनाही बेदम मारण्यात आले.
आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल, पोलिसांची कारवाई सुरू
या अमानुष मारहाणीनंतर वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी प्रतीक सतीश राजपूत, ऋषिकेश रामनाथ दुबिले, रोहित शंकरसिंग बहुरे आणि निलेश रामनाथ दुबिले यांना अटक केली आहे.
महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत असून, या घटनेने शहरात खळबळ माजवली आहे. स्थानिक नागरिकांनी अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. (Crime News)
Title : Crime News Family Beaten for Questioning Eve-Teasing in Chhatrapati Sambhaji Nagar






