Crime | खतरनाक प्लॅनिंग; ठाण्यातील हत्याकांडाने महाराष्ट्रात खळबळ

On: December 11, 2023 6:13 PM
Crime
---Advertisement---

मुंबई | महाराष्ट्रात दिवसेंदिवस गुन्हेगारी (Crime) वाढत चालली आहे. तसेच मुंबई, पुणे यांसारख्या शहरात गुंडांनी अक्षरश: हैदोस घातला आहे. अशात आता ठाण्यात झालेल्या हत्याकांडाने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.

ठाण्यात एका व्यावसायिकाची भररस्त्यात हत्या (Crime)करण्यात आली आहे. सतीश पाटील असे हत्या झालेल्या व्यवसायिकाचे नाव आहे. ते वर्तकनगर येथील देवदयानगर परिसरात राहत होते. दीड कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहारातून ही हत्या झाल्याची माहिती समोर आलीये.

Crime | हत्येचं खतरनाक प्लॅनिंग

सतीश पाटील हे ओवळा भागातील विहंग व्हॅली चौकात आले असताना, भूषण पाटील हा काही काम असल्याचं सांगून खाली उतरला. त्याचवेळी बाईकवरून दोनजण सतीश पाटील यांच्या कारजवळ आली. गाडीशेजारी पोहोचताच दोघांनीही तलवारीने सतीश पाटील यांच्यावर सपासप वार केले.

अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सतीश पाटील गंभीर जखमी झाले आणि रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. गंभीर जखमी झाल्याने सतीश पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. संशय येऊ नये म्हणून भूषण पाटीलने हल्लेखोरांकडून स्वत:च्या हातावर वार करून घेतले. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

हत्या करण्यामागचं कारण समोर?

भूषण पाटील हा कर सल्लागार आहे. सतीश पाटील यांच्याकडून त्याने दीड कोटी रुपये उसने घेतले होते. पैसे परत करण्याची वेळ आल्यावर भूषणचे मन बदलले. भूषणने नितीनला सोबत घेतले आणि त्याच्याशी चर्चा केली. यानंतर दोघांनी सुपारी घेऊन हत्या करणाऱ्यांशी संपर्क साधल्याची माहिती समोर आलीये.

पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला असता त्यांना सतीश यांनी अनेकदा भूषण पाटील याच्याशी संभाषण केल्याचे समोर आलं. मात्र अखेर पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Rohit Sharma | रोहित शर्मा फिट नाही?, बीसीसीआयचा सर्वात मोठा खुलासा

Madhya Pradesh CM | मध्य प्रदेशात भाजपचा मोठा धक्का, ‘या’ नेत्याला केलं मुख्यमंत्री

Maharashtra News | सर्वात मोठी बातमी! मराठवाड्यातील ‘या’ भागात नागरिकांना धोका

HDFC बँकेची मोठी घोषणा; ‘या’ लोकांना फायदाच फायदा

Weather Update | हुडहुडी वाढणार!, महाराष्ट्राच्या ‘या’ भागाला हवामान खात्याचा इशारा

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now