हार्दिक पांड्याबाबत प्रसिद्ध क्रिकेटपटूचं धक्कादायक वक्तव्य, क्रिकेटविश्वात खळबळ

On: February 24, 2024 7:23 PM
Akash Chopra shocking statement about Hardik Pandya
---Advertisement---

Hardik Pandya |आयपीएलच्या 17 व्या मोसमाला (IPL 2024) काहीच दिवस बाकी आहेत. पहिला सामना 22 मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. मात्र, यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वांना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टाईटन्स या दोन संघांच्या सामन्याची प्रतीक्षा असणार आहे. त्यातच हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya ) खेळीकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

मुंबई इंडियन्सला 5 वेळा चॅम्पियन बनवणाऱ्या रोहित शर्माला कॅप्टनशिपवरुन काढून हार्दिक पांड्याकडे नेतृत्व सोपवण्यात आलंय. या निर्णयामुळे चाहत्यांची बरीच नाराजी आहे. त्यातच हार्दिक पांड्यावर अजूनही चाहते आणि काही दिग्गज क्रिकेटपटू देखील नाराज आहेत. हार्दिक मागच्या सीजनपर्यंत गुजरात टायटन्सचा कॅप्टन होता, मात्र यंदा तो मुंबई इंडियन्सचा कॅप्टन असणार आहे.

अशातच माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध कॉमेंटेटर आकाश चोपडा यांनी हार्दिकवर निशाणा साधत त्याच्याबाबत धक्कादायक वक्तव्य केल्याने सगळीकडे चर्चा होत आहे. हार्दिक मुंबईचा कॅप्टन झाल्याने काही क्रिकेटपटूंना देखील ते रुचलं नसल्याचं आता म्हटलं जातंय.

“अहमदाबादमध्ये चिडवावं, डिवचावं”

जिओ सिनेमाच्या शोमध्ये आकाश चोप्रा यांनी म्हटलं की, “हार्दिक पांड्याला (Hardik Pandya ) अहमदाबादमध्ये चिडवावं, डिवचावं अशी माझी इच्छा आहे. कारण आयपीएलच्या पहिल्या सीजनमध्ये मुंबई आणि कोलकातामध्ये सामना होता. आम्ही वानखेडे स्टेडियमवर खेळत होतो. अजित आगरकर आमच्या कोलकाताच्या टीममध्ये होता. आम्हाला त्याला बाऊंड्री लाइनवरुन हटवावं लागलं, कारण तो मुंबईचा होता. अजित आगरकर मुंबई विरुद्ध मुंबईत खेळत होता. वानखेडेच्या प्रेक्षकांनी त्याला तेव्हा खूप डिवचलं होतं.”, असा खुलासा आकाश चोप्रा यांनी केला.


पुढे ते म्हणाले की, काही वर्षांपूर्वी जे अजित आगरकरसोबत मैदानावर झालं, तेच आता हार्दिक पांड्यासोबत गुजरातमध्ये झालं पाहिजे. आकाश चोप्रा यांच्या या अजब इच्छेमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आता आयपीएल सुरु झाल्यानंतर फॅन्स हार्दिक पांड्यासोबत कसं वर्तन करतात ते दिसून येईलच, मात्र, हार्दिक सध्या सर्वांच्याच नजरेत असल्याचं यातून दिसून येतंय.

IPL 2024 मधील 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर

सध्या 22 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीतील सामन्यांचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे, ज्या दरम्यान एकूण 4 डबल हेडर सामने खेळवले जातील. यावेळी दिल्ली कॅपिटल्स संघ विशाखापट्टणम येथे दोन सामने खेळणार आहे, जे त्यांचे घरचे मैदान असेल. संध्याकाळचे सामने 7.30 वाजता सुरू होतील, तर दुपारचे सामने 3.30 वाजता सुरू होतील.

News Title- Cricketer Akash Chopra shocking statement about Hardik Pandya

महत्त्वाच्या बातम्या –

सासऱ्यांविरोधात लढणार का?; रक्षा खडसेंनी स्पष्टच सांगितलं

शर्मिला ठाकरे अन् अमित ठाकरे उतरले पुण्याच्या रस्त्यावर, केली मोठी मागणी

उद्धव ठाकरेंना धक्का?; ईडीच्या कचाट्यात सापडलेला नेता शिंदे गटाच्या वाटेवर?

रोहित पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप; म्हणाले..

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

Join WhatsApp Group

Join Now