हॉटनेसचा तडका अन् मनोरंजन! करीना, तब्बू आणि क्रितीचा ‘क्रू’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

On: February 25, 2024 8:21 AM
Crew Movie
---Advertisement---

Crew Movie | बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेनॉन त्यांच्या आगामी ‘क्रू’ चित्रपटामुळे सतत चर्चेत असतात. या चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टरही समोर आला आहे. (Crew Movie Trailer) या तिन्ही अभिनेत्री पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. शुक्रवारी चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर केले होते. ज्यामध्ये तब्बू, करीना कपूर आणि क्रिती सेनॉनचा लूक सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

सध्या बॉलिवूडमध्ये वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट बनत आहेत. आता करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेनॉन असेच काहीतरी नवीन घेऊन येणार आहेत. विशेष बाब म्हणजे हे त्रिकूट पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र दिसणार आहे. ‘क्रू’ असे त्यांच्या चित्रपटाचे नाव आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचा टीझर सर्वांसोबत शेअर केला आहे.

‘क्रू’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

दरम्यान, आता निर्मात्यांनी चित्रपटाचा टीझरही शेअर केला आहे. चित्रपटाची माहिती शुक्रवारी शेअर करण्यात आली होती की, ‘क्रू’चा टीझर शनिवारी म्हणजेच 24 फेब्रुवारीला येणार आहे. त्यांच्या आश्वासनानुसार, निर्मात्यांनी प्रेक्षकांना ही भेट दिली आहे. ‘क्रू’ चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यामध्ये तब्बू, करीना आणि क्रिती त्यांच्या एअर होस्टेसच्या नोकरीमुळे खूप त्रस्त आहेत.

यामध्ये तिन्ही अभिनेत्री काहीतरी मोठे नियोजन करण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या नोकऱ्यांव्यतिरिक्त, त्या पुरुषांच्या बाबतीतही खूप त्रासलेल्या दिसतात. मग त्या आपल्या नशिबावर विश्वास ठेवत पुढील पावले टाकतात. काहीतरी मोठे करायचे असा त्यांचा मानस असतो. याशिवाय दिलजीत दोसांझ आणि कपिल शर्मा यांचीही झलक या फोटोमध्ये पाहायला मिळते.

Crew | Teaser | Tabu, Kareena Kapoor Khan, Kriti Sanon, Diljit Dosanjh, Kapil Sharma | March 29

 

Crew Movie चा टीझर लॉन्च

चित्रपटाच्या कहाणीची झलक पाहिल्यानंतर प्रेक्षक चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहत होते. चित्रपटाचे पोस्टर पाहिल्यानंतर, असे मानले जात होते की ‘क्रू’मध्ये करीना कपूर, तब्बू आणि क्रिती यांचा समावेश असेल, जे चित्रपटात फ्लाइट अटेंडंट म्हणून दिसणार आहेत. पण टीझर पाहिल्यानंतर स्टोरीत मोठा ट्विस्ट आला आहे. या तिन्ही अभिनेत्रींची ग्लॅमरस स्टाईल टीझरमध्ये पाहायला मिळणार आहे.

अलीकडेच करीना कपूरने तिच्या एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, या चित्रपटात करीना, तब्बू आणि क्रिती यांच्याशिवाय दिलजीत दोसांझही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय या चित्रपटात कॉमेडी किंग कपिल शर्माचा खास सहभाग दाखवण्यात येणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. हा चित्रपट 29 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

News Title- trailer of Bollywood actress Kareena Kapoor, Tabu and Kriti Sanon’s film Crew has been released
महत्त्वाच्या बातम्या –

रणजी ट्रॉफीच्या सामन्यादरम्यान दुर्दैवी घटना; युवा खेळाडूच्या मृत्यूमुळे खळबळ

आमिर खानला ‘त्या’ गोष्टीचा अजूनही होतोय पश्चाताप; मोठा खुलासा करत म्हणाला…

’12th Fail’ फेम विक्रांत मेस्सीच्या घरी चिमूकल्याचं आगमन; गोड फोटो आले समोर

हार्दिक पांड्याबाबत प्रसिद्ध क्रिकेटपटूचं धक्कादायक वक्तव्य, क्रिकेटविश्वात खळबळ

मुलीसाठी शाहीद कपूरने सोडली आवडती गोष्ट; कारण तुम्हालाही अभिमान वाटेल

Join WhatsApp Group

Join Now