Credit Card l क्रेडिट कार्ड लिमिट वाढवायचयं? तर या टिप्स फॉलो करा

On: January 6, 2024 9:25 AM
Credit Card
---Advertisement---

Credit Card l आजकाल अडचणीच्या काळात क्रेडिट कार्ड उपयुक्त ठरते. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या चांगलीच वाढली आहे. मात्र बँकेतून क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी सिबिल स्कोर हा 700 ते 750 असणे गरजेचे असते. मात्र काही नागरिकांच्या क्रेडिट कार्डची मर्यादा कित्येक दिवस वाढत नाही, अशावेळी क्रेडिट कार्ड मर्यादा कशी वाढवायची हे माहित असणे गरजेचे आहे.

Credit Card l तुमचे क्रेडिट कार्ड वापरा :

तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड नियमितपणे वापरत असल्यास आणि तुमचे बिल पूर्ण आणि वेळेवर भरल्यास बँक तुमच्या कार्डावरील क्रेडिट मर्यादा आपोआप वाढवते. त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे असलेल्या क्रेडिट कार्ड मर्यादा वाढवण्यासाठी क्रेडिट कार्डचा योग्य वापर करायला हवा.

Credit Card l बँकेमध्ये क्रेडिट मर्यादा वाढवण्याची विनंती करा :

जर तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर योग्य करत असाल तर तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवण्यासाठी बँकेला विनंती करू शकता. तसेच तुम्ही केलेली विनंती तपासून तुमची बँक क्रेडिट कार्ड मर्यादा वाढवू शकते. सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही ऑनलाईन नेटबँकिंगद्वारे किंवा तुमच्या बँकेच्या शाखेला भेट देऊन देखील मर्यादा वाढवण्याची विनंती करू शकता.

Credit Card l क्रेडिट स्कोर चांगला ठेवा :

अनेकजण क्रेडिट कार्डचा वापर करतात. मात्र योग्य वेळेत रिपेमेंट न करणे हे क्रेडिट स्कोर कमी करण्याचे मुख्य कारण आहे. त्यामुळे तुम्ही क्रेडिट कार्डचे रिपेमेंट योग्य वेळेत जमा करावे. यासाठी क्रेडिट सिबिल स्कोर चांगला ठेवण्याचा प्रयत्न करा.

 

वेळेवर आणि पूर्ण रिपेमेंट करणे तसेच EMI वेळेवर भरणे ही काळजी घेऊन तुम्ही तुमचा सिबिल स्कोर चांगला ठेवू शकता. अशावेळी तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचा सिबिल स्कोर चांगला असल्यास तुम्ही बँकेमध्ये जाऊन क्रेडिट कार्ड लिमिट वाढवण्यासाठी अर्ज देखील करू शकता.

महत्त्वाच्या बातम्या-

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now