Corona Virus Update | पुन्हा धोका वाढला, महाराष्ट्रानं सुरु केली ‘ही’ महत्त्वाची तयारी!

On: December 20, 2023 9:33 PM
Japan Flu News 
---Advertisement---

Corona Virus Update | काही दिवसांपूर्वी केरळमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट सापडल्याची माहिती समोर आली होती. या व्हेरिएंटमुळे केरळमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने महाराष्ट्रात शिरकाव केल्याची माहिती समोर आली आहे

Corona Virus Update | नव्या व्हेरिएंटचा महाराष्ट्रात शिरकाव

महाराष्ट्रासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. महाराष्ट्रात सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी 45 वर पोहोचली आहे. यामध्ये मुंबईतील 27, ठाण्यातील 8, रायगड 1, पुणे 8, कोल्हापूरमधील 1 रुग्णाचा समावेश आहे.

Corona Virus Update | महाराष्ट्रानं सुरु केली ‘ही’ तयारी!

नव्या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव पाहता राज्यातील 17 डिसेंबरला विविध रुग्णालयांमध्ये तयारीच्या दृष्टीने मॉकड्रिल पार पडलं आहे. कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक दक्षता घेण्याची गरज आहे, असं शासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

सर्व नागरिकांनी आवश्यकतेनुसार गरजेच्या ठिकाणी मास्क घालणे, वारंवार हात धुणे आणि कोविड नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. या नवीन व्हेरीयंटच्या पाश्र्वभूमीवर सर्व जिल्हयांना दक्षता घेण्याचे कळविण्यात आलं आहे. रुग्णांचे सर्वेक्षण अधिक सक्षम करण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

8 डिसेंबर रोजी भारतात JN.1 व्हेरिएंटचा पहिलं प्रकरण समोर आलं होतं. केरळमधील 79 वर्षीय महिलेला याची लागण झाली होती. ही बाब समोर आल्यानंतर केरळसह शेजारील राज्यांना सतर्क करण्यात आले. त्याचवेळी, सोमवारी केंद्र सरकारने राज्यांना कोरोनाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून सतर्क राहण्याचा सल्ला दिला होता. केंद्राने राज्यांना आरटी-पीसीआरसह पुरेशा चाचण्या सुनिश्चित करण्याचा सल्ला दिला आहे आणि जीनोम सिक्वेन्सिंगसाठी सकारात्मक नमुने INSACOG प्रयोगशाळांमध्ये पाठवावेत.

महत्त्वाच्या बातम्या-

Milk Farmers | दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर!

Pune News | पुण्यात धक्कादायक प्रकार, भाजप नेत्यानं रेल्वेखाली उडी मारुन आयुष्य संपवलं

Weather Alert | ‘या’ जिल्ह्यांमध्ये थंडी वाढणार, हवामान विभागाचा इशारा

Ajit Pawar | जयंत पाटलांच्या वक्तव्याने सभागृहात वातावरण पेटलं, अजितदादा उठले अन्…

Lok Sabha Elections 2024 | अभिनेत्री Kangana Ranaut निवडणुकीच्या रिंगणात, ‘या’ जागांवरुन लढण्याची शक्यता

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now