Corona JN1 | कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लक्षणं कोणती?, प्रसिद्ध डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

On: December 21, 2023 5:23 PM
Corona JN1
---Advertisement---

Corona JN1 | कोरोनाचा (Corona Update) नवीन व्हॅरीयंट मिळाल्यानंतर आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. यावर ज्येष्ठ कोव्हिड तज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी प्रतिक्रियी दिली. त्यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. नव्या जेएन 1 व्हेरियंटने घाबरून जाण्याचं कारण नाही, असं डॉ. तात्याराव लहाने म्हणालेत.

Corona JN1 | नव्या व्हेरियंटची लक्षणं कोणती?

हा सौम्य स्वरूपाचा व्हायरस आहे. ताप येणे, नाक गळणे, जुलाब होतात यापुढे फार काही होत नाही. यापासून फुफुसाला संसर्ग होण्याचा धोका नाही. मात्र पुढे तो काय स्वरूप प्राप्त करतो ते पाहावे लागेल, असं डॉक्टर लहाने म्हणाले.

ओमायक्रॉननंतर जे व्हेरियंट आलं त्यापासून फार धोका पाहायला मिळाला नाही. WHO ने याला व्हेरियंट म्हणून घोषित केला आहे. हा व्हेरियंट ऑगस्टमध्ये सापडला आहे. मात्र मागील पाच महिन्यात या व्हेरियंटने फारसा धोका निर्माण केला नाही. त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही, असं डॉ. तात्याराव लहाने म्हणालेत.

सर्व नागरिकांनी आवश्यकतेनुसार गरजेच्या ठिकाणी मास्क घालणे, वारंवार हात धुणे आणि कोविड नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. या नवीन व्हेरीयंटच्या पाश्र्वभूमीवर सर्व जिल्हयांना दक्षता घेण्याचे कळविण्यात आलं आहे. रुग्णांचे सर्वेक्षण अधिक सक्षम करण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Corona JN1 | महाराष्ट्र सरकार अलर्ट

कोरोना रूग्णाची वाढती आकडेवारी पाहता महाराष्ट्र सरकारही सावध झालं आहे. गोवा, केरळ आणि महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. महाराष्ट्रात सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी 45 इतकी आहे. त्यामध्ये मुंबईतील 27, ठाणे 8, रायगड 1, पुणे 8, कोल्हापूरमधील 1 रुग्ण यांचा समावेश आहे.

दरम्यान, कोरोनाच्या जेएन 1 विषाणूचा रुग्ण सापडल्याने पुणे महापालिका अलर्ट मोडवर गेली आहे. पुणे महापालिका आयुक्तांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शहरात कोविड चाचण्या वाढवण्याच्या सूचना दिल्या.

महत्त्वाच्या बातम्या- 

Shreyas Talpade | तब्येतीबाबत स्वतः श्रेयसने दिली मोठी माहिती

Corona JN1 | महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा, ‘या’ जिल्ह्यात सापडला नव्या कोरोनाचा रुग्ण

CoronaVirus | कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लागण झाली तरी घाबरु नका!, तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती

Aishwarya Rai च्या नात्याबद्दल मोठा गैप्यस्फोट!

Crime | पूजाच्या सांगण्यावरुन ‘तो’ व्हिडीओ कॉलवर न्यूड झाला अन्…, पुढे घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now