‘डुकराचा दात रात्रभर पाण्यात ठेवा आणि…’; कालिचरण महाराजाचं वादग्रस्त वक्तव्य

On: December 14, 2022 4:38 PM
---Advertisement---

अहमदनगर | अहमदनगरमधील हिंदू जनआक्रोश मोर्चात वादग्रस्त कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) सहभागी झाले होते. यावेळी बोलताना त्यांनी लव्ह जिहादवर मोठं वक्तव्य केलं आहे.

डुकराचा दात रात्र भर पाण्यात ठेवा आणि मुलीला प्यायला द्या मग बघा डोकं ठिकण्यावर येईल, सर्व भूत प्रेत मंत्र तंत्र बाहेर येईल असा अजब दावा वादग्रस्त कालीचरण महाराज यांनी केला आहे.

अहमदनगर येथे सकल हिंदू धर्माच्या वतीने लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्याच्या मागणीसाठी काढण्यात आला होता. या मोर्चात कालीचरण महाराज, काजल दीदी हिंदुस्थानी यांनी मोर्चात सहभाग घेतला होता. याच मोर्चात कालीचरण महाराज यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

कालीचरण महाराज यांच्या अजब दाव्याने मोठा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. लव्ह जिहाद विरोधी आणि धर्मांतर विरोधी कायदा महाराष्ट्रासह देशभरात लागू करावा या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला होता.

धर्म म्हणजे सनातन धर्म कोणता ही मौलाना म्हणणार नाही इस्ल्माम धर्म. त्यांना लहानपणापासून मदारश्यात शिकवलं जातं. तुम्हाला काय शिकवलं जातं, असा सवाल कालिचरण महाराज यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now