Jitendra Awhad | ‘एवढी वर्ष जंगलात राहून…’; श्रीरामाबद्दल जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त वक्तव्य

On: January 4, 2024 8:24 AM
Jitendra Awhad
---Advertisement---

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी शिर्डीत पक्षाच्या शिबिरात प्रभू श्रीराम (Shri Ram) मांसाहारी असल्याचं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता. त्याने 14 वर्ष वनवास भोगला होता मग ते शाकाहारी कसे असू शकतात?, असा सवाल त्यांनी केला.

शिर्डीत शरद पवार गटाचे दोन दिवसीय शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना आव्हाड (Jitendra Awhad) बोलत होते.

Jitendra Awhad नेमकं काय म्हणाले?

आपण अनेक इतिहास लक्षात ठेवत नाही, वाचत नाही. राजकारणात वाहून जातो. राम हा आमचा, बहुजनांचा आहे. शिकार करून खाणारा राम हा बहुजनांचा आहे. रामाचा आदर्श सांगून लोकांवर शाकाहार थोपवला जात आहे. 14 वर्ष जंगलात असणारे राम शिकार करायचे असे वक्तव्यही जितेंद्र आव्हाड यांनी केलंय.

Jitendra Awhad यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद

जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डी येथील शिबिरात प्रभू श्रीराम हे मांसाहारी असल्याचे वक्तव्य केल्यानंतर ठाण्यातील आव्हाडांच्या घराबाहेर अजित पवार गटाच्या काही कार्यकर्त्यांनी निषेध केला. त्यांनी आव्हाडांच्या घराबाहेर महाआरती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेतलं.

आता भाजपा नेत्यांनी जितेंद्र आव्हाडांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे आमदार राम कदम यांनी जितेंद्र आव्हाड यांनी हा जावईशोध कुठून लावला असं विचारलं आहे. तसंच महाराष्ट्रातली रामभक्त जनताच आता तुम्हाला धडा शिकवेल असंही राम कदम म्हणाले आहेत.

माणूस कधी मांसाहारी होता आणि कधी शाकाहारी झाला याचा मानवी इतिहास ज्यावेळी खाद्य उगवत नव्हते त्यावेळी लोक काय खायचे? ऋग्वेदामध्ये लिहिलं आहे, वेद वाचा. कुणी कुठल्या मांसाचे भक्ष्यण केलंय स्पष्टपणे कळेल, असं आव्हाड म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

Virat Kohli | ‘राम सिया राम’…; भरमैदानात किंग कोहली रामलल्लांच्या भक्तीत तल्लीन

Women Employee Pension | पेन्शनच्या नियमात आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल, पेन्शनधारकांनी आत्ताच वाचा!

Petrol Diesel Price | पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार?, पेट्रोलियम मंत्रालयानं दिली सर्वात मोठी माहिती

‘…तो दारु पिऊन धिंगाणा घालायचा, शिवाय शारीरिक…’; Aishwarya Rai ने केला मोठा गौप्यस्फोट

Health Update | शरीरामध्ये रक्ताची कमतरता भासतेय?; ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now