Maratha Reservation | मराठा आरक्षणाची लढाई संपली नाही?; घटनातज्ज्ञ उल्हास बापटांचं मोठं वक्तव्य

On: January 27, 2024 2:01 PM
NCP
---Advertisement---

मुंबई | मनोज जरांगे पाटील (Maratha Reservation) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडलं आहे. तसेच सरकारने काढलेल्या जीआरमुळे 54 लाख नोंदी सापडलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मराठा आरक्षणाची लढाई संपली नाही?

राज्यात मराठा आंदोलक, मराठा समाजात मोठा जल्लोष सुरु आहे. पण खरं मराठा आरक्षणाची लढाई संपली का?, असा सवाल केला जात आहे. याबाबत घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी प्रतिक्रिया देताना मोठं वक्तव्य केलं आहे. आता पुढची लढाई कोर्टात होईल, असं वक्तव्य घटनातज्ज्ञ उल्हास बापटांनी केलं आहे. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

Maratha Reservation | घटनातज्ज्ञ उल्हास बापटांचं मोठं वक्तव्य

मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या आहेत. पण याच्या विरुद्ध निश्चित जे ओबीसी लोक आहेत ते कोर्टात जाणार हे निश्चित आहे. आणि मग ही लढाई पुढची कोर्टात होणार आहे, असं उल्हास बापटांनी सांगितलं आहे. ओबीसी नेते सरकारच्या या आदेशाविरुद्ध कोर्टात दाद मागतील. सुप्रीम कोर्टात क्यूरेटिव्ह पिटीशन पण पेंडिंग आहे. त्यामुळे या विषयावर सुप्रीम कोर्टाचा काय निकाल येतो, त्यानंतर बोलणं योग्य राहिल, असंही ते म्हणालेत.

ओबीसी नेते आक्रमक

अनेकांनी सरकारच्या भूमिकेवर ताशेरे ओढले आहे. काहींनी मराठी युद्ध जिंकलं असलं तरी तहात हरल्याचं म्हटलंय. छगन भूजबळ यांनी ही मराठा समाजाची (Maratha Reservation) फसवणूक असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

तूर्तात असं वाटत आहे की मराठा समाजाचा विजय झाला. मराठा समाजाचा विजय झाला असं मला वाटत नाही. अशारितीने झुंडशाहीने नियम कायदे बदलता येत नाही. समता परिषदेच्या माध्यमातून याचा विचार करु आणि योग्य कारवाई करु. हे सगेसोयरे कायद्याच्या कसोटीवर अजितबात टिकणार नाहीत असं माझं मत आहे, असंही ते म्हणालेत.

मराठा समाजाच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे की, ओबीसीच्या 17 टक्के आरक्षणात येण्यात तुम्ही जिंकलात असे तुम्हाला वाटत आहेत. या 17 टक्क्यांमध्ये सगळे लोक येतील. इडब्ल्यूएसच्या आधारे तुम्हाला दहा टक्के आरक्षण मिळत होतं. ते यापुढे मिळणार नाही. खुल्या गटातील जे आरक्षण होतं ते सुद्धा आता मिळणार नाही. तुम्हाला 50 टक्क्यांमध्ये संधी होती. ती संधी गमावली. आता 374 जातींसाठी असलेल्या 17 टक्के आरक्षणासाठी तुम्हाला झगडावं लागेल, असं भुजबळ म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

Maratha Reservation | जरांगे पाटील यांच्या भाषणातील पाच प्रमुख मुद्दे, वाचा एकाच ठिकाणी

Manoj Jarange | “विजयाचं श्रेय माझ्या मराठा बांधवांचं, भविष्यात अडचणीवेळी पुन्हा उभा राहणार”

Sania Mirza | शोएब मलिकसोबतच्या घटस्फोटानंतर सानिया मिर्झाची पहिलीच पोस्ट, म्हणाली..

Manoj Jarange | ‘धोका झाला तर…’; मनोज जरांगेंचा सरकारला गंभीर इशारा

Marath Reservation | मनोज जरांगे यांच्या लढ्याला यश; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस प्राशन करून उपोषण सोडलं

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now