“चमत्कार करुन जोशीमठची दुभंगलेली जमीन जोडून दाखवा”

On: January 23, 2023 2:30 PM
---Advertisement---

नवी दिल्ली | बागेश्वर धाम (Bageshwar Dham) येथील धीरेंद्र कृष्ण महाराज (Dhirendra Krushna Maharaj) हे चमत्कार करतात असा दावा काही लोकांनी केला, त्यावर आता शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी त्यांना आव्हान दिलं आहे.

धीरेंद्र शास्त्री यांना थेट आव्हान देत तुम्ही जर चमत्कार करणारे असाल तर जोशीमठ येथे येऊन दुभंगत असलेली जमीन जोडून दाखवा, तरच तुम्ही चमत्कारी असल्याचे मानू, असं आवाहन

धीरेंद्र शास्त्री यांना थेट आव्हान देत तुम्ही जर चमत्कार करणारे असाल तर जोशीमठ येथे येऊन दुभंगत असलेली जमीन जोडून दाखवा, तरच तुम्ही चमत्कारी असल्याचे मानू, असं आवाहन शंकराचार्यांनी धीरेंद्र कृष्ण महाराज यांना दिलंय.

स्वतःची प्रसिद्धी होण्यासाठी कुणी चमत्कारी होण्याचा दावा करत असेल तर त्याला संत मानता येणार नाही. आम्ही देखील संत नाहीत, असं शंकराचार्य स्वामींनी म्हटलंय.

तुमच्याकडे जर खरंच अलौकिक शक्ती आहे तर मग धर्मांतरण थांबवून दाखवा, गृह क्लेष मिटवा, आत्महत्या थांबवा, जगात शांती प्रस्थापित करा, तरच आम्ही त्याला चमत्कार मानू. तसेच आमच्या जोशीमठमध्ये या आणि जमीन दुभंगली आहे, ती ठिक करा, असं आव्हानच शंकराचार्य यांनी दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now