कंगनावर अत्यंत आक्षेपार्ह पोस्ट, काँग्रेस नेत्या अडचणीत; नेमकं प्रकरण काय?

On: March 26, 2024 1:37 PM
Congress leader Supriya Shrinate offensive post about Kangana Ranaut
---Advertisement---

Kangana Ranaut | अभिनेत्री कंगना रनौतला भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीचं तिकीट दिलं आहे. कंगनाला हिमाचल प्रदेशमधील मंडी येथून उमेदवारी जाहीर केली आहे. कंगनाला उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसच्या महिला नेत्याने तिच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह पोस्ट केली आहे.

यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यामुळे वादात अडकल्या आहेत. काँग्रेसच्या महिला नेत्या सुप्रिया श्रीनेत यांच्या फेसबूक आणि इन्स्टाग्राम अकाउंटवरून कंगनाचा एका अश्लील कॅप्शन आणि फोटो पोस्ट करण्यात आला होता. यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला आहे.

नंतर श्रीनेत यांनी व्हिडीओ पोस्ट करत या सर्व घटनेबाबत स्वतःची भूमिका मांडली आहे. त्यांच्या या पोस्टवर अभिनेत्री कंगनानेही प्रत्युत्तर दिलं आहे. वाद निर्माण होताच श्रीनेत यांच्याकडून ती पोस्ट डिलिट देखील करण्यात आली आहे. मात्र, यावर अभिनेत्री कंगनाने सुप्रिया श्रीनेत यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

कंगना रनौतचं सडेतोड प्रत्युत्तर

कलाकार म्हणून माझ्या 20 वर्षांच्या करिअरमध्ये मी अनेक महिलांच्या भूमिका साकारल्या आहेत. आपण आपल्या मुलींना पूर्वग्रहाच्या बंधनातून मुक्त केले पाहिजे. प्रत्येक स्त्री तिच्या सन्मानास पात्र आहे. क्वीन मध्ये एका साध्या मुलीपासून धाकड सिनेमात एक गुप्तहेर… मणिकर्णिका सिनेमात देवी पासून ‘चंद्रमुखी’ सिमेतील राक्षसापर्यंत… ‘रज्जो’ सिनेमात एका वेश्या पासून ते ‘थलायवी’ सिनेमात एक क्रांतिकारी नेता पर्यंत… मी प्रत्येक भूमिका साकारली आहे. वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांचा अशाप्रकारे अपमान करणं थांबवलं पाहिजे, अशी पोस्ट कंगनाने (Kangana Ranaut) केली आहे.

सुप्रिया श्रीनेत यांनी भूमिका मांडली

सुप्रिया श्रीनेत यांनी कंगनाबाबत करण्यात आलेल्या पोस्टवर व्हिडीओद्वारे आपली भूमिका मांडली आहे. त्या म्हणाल्या की, मी सर्व शक्तीनिशी विचारधारेची लढाई लढत आहे. पण मी कधी कोणत्या महिलेच्या विरोधात वैयक्तिक टिप्पणी करु शकत नाही, अशा प्रवृत्तीचा मी विरोध करते.

जी लोकं मला ओळखतात त्यांना माहिती आहे की मी असं कधीही करणार नाही. दुसऱ्या अकाउंटवरून हे कृत्य करण्यात आलं आहे, असं करणाऱ्याच्या शोधात मी आहे. माझ्या नावाचा गैरवापर करून तयार करण्यात आलेल्या पॅरोडी अकाउंटची तक्रार एक्स (ट्विटर) कडे करण्यात आली आहे, असं सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या आहेत.

सुप्रिया श्रीनेत यांनी ‘मंडी मे क्या भाव चल रहा हे’, अशी अश्लील पोस्ट केली होती. मात्र त्यांनी ही पोस्ट दुसऱ्या अकाऊंटवरून करण्यात आल्याचं म्हटलं आहे. कुणीतरी माझं बनावट अकाऊंट तयार करून ही पोस्ट करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय. यामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. भाजपाच्या अनेक नेत्यांनी याचा निषेध केला आहे. तसंच याबाबत सडेतोड उत्तर दिलं जाईल, असंही भाजपाने म्हटलं आहे. त्यामुळे सध्या कंगनाबाबत (Kangana Ranaut) करण्यात आलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

News Title : Congress leader Supriya Shrinate offensive post about Kangana Ranaut

महत्वाच्या बातम्या-

लेकीला उमेदवारी न दिल्यानं विजय वडेट्टीवर नाराज?

लग्नाला 13 वर्षे झाली, गुड न्यूज कधी देणार? प्रिया बापट म्हणाली…

‘त्यावेळी जातीचे रंग’; कुशल बद्रिकेची पोस्ट व्हायरल

प्रसिद्ध अभिनेत्रीने गुपचूप उरकलं लग्न?, ‘त्या’ फोटोंमुळे चर्चांना उधाण

“काळे झेंडे दाखवणाऱ्या मुलांवर गुन्हा….”; पंकजा मुंडेंची पोलिसांकडे मोठी मागणी

Join WhatsApp Group

Join Now