बॉसने कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी खर्च केले तब्बल ‘इतके’ कोटी!

On: January 13, 2023 11:56 AM
---Advertisement---

मुंबई। बॉसला खुश करायचं म्हणून कर्मचारी त्यावर काय काय करतात हे तुम्हाला सुद्धा माहित आहे. मात्र कधी बॉसनं कर्मचाऱ्यांना खुश केलं असं ऐकलं आहे का? तर मार्क नील्सन हा त्याच्या कर्मचाऱ्यांना ज्या प्रकारे वागणूक देतो ते वाचून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल.

मार्क नील्सन हा बॉस कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम महागड्या भेट वस्तु देत असतो. एवढंच नव्हे तर आयुष्यात श्रीमंत कसं व्हायचं या बद्दल सुद्धा तो सल्ले देतो. मार्क नील्स त्यांच्या कर्मचाऱ्यांना बोलत असताना म्हणाले होते की, मी स्वतः गरिबीतून वर आलो आहे, आज मी खूप श्रीमंत झालो आहे, आणि म्हणून मला माझी संपत्ती अजून वाढवण्याऐवजी लोकांना पैसे देऊन आनंदी ठेवायचं आहे.

माध्यमांच्या माहितीनुसार मार्क नील्सन यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी एक हॉलिडे प्लॅन केला आहे. त्यांनी 4 कोटी पेक्षा जास्त रुपये आपल्या कर्मचाऱ्यांसाठी खर्च करून हा प्लॅन बनवला आहे. इतकंच नाही तर आपल्या कर्मचाऱ्यांना यामधून कॅश हँडआउट्स देखील दिले जातील.

या आधी सुद्धा मार्क नील्सन त्याच्या कंपनीतील किमान 50 कर्मचाऱ्यांना 82 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च करून आइसलँडला पाठवले होते. त्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी त्यांनी फाइव्ह स्टार हॉटेल बूक केलं होतं.

त्याच्या या कर्मचाऱ्यांना त्यानं तिथे खर्च करण्यासाठी तब्ब्ल 61 लाख रुपये दिले होते. नील्सन म्हणतात, याद्वारे मी कर्मचाऱ्यांना प्रेरित करून त्यानं कंपनीच्या नवीन ध्येयाबद्दल माहिती देतो.

थोडक्यात बातम्या-

रामदास आठवले शिंदेंवर नाराज?; मोठा निर्णय घेणार?

काँग्रेसमध्ये मोठी फूट?, हा आमदार भाजपात जाणार?

दयाबेनची अवस्था झालीय फार वाईट, ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल

“महाराष्ट्राला धक्का बसतील असे महाविकास आघाडीतील लोक भाजमध्ये येणार आहेत”

टेंशन वाढलं! उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुखपदाची मुदत संपणार

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now