अभिजीत दीपकेंनी दिल्ली पोलिसांचा प्लॅन हाणून पाडला; ‘ते’ कृत्य थेट जनतेसमोर आणलं  

On: July 20, 2026 12:54 PM
CJP Protest
---Advertisement---

CJP Protest | दिल्ली येथील जंतरमंतर (Jantar Mantar) परिसरात सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या (Cockroach Janata Party) आंदोलनादरम्यान नव्या वादाला तोंड फुटले आहे. पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके (Abhijeet Deepke) यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आंदोलनस्थळी दगडांनी भरलेला ट्रक आणि काचा फुटलेली कार आणण्यात आल्याचा दावा केला आहे. या प्रकरणावरून त्यांनी दिल्ली पोलीस (Delhi Police) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

आंदोलनस्थळी दगडांचा ट्रक असल्याचा दावा :

20 जुलै रोजी संसदेकडे मोर्चा काढण्याची घोषणा कॉकरोच जनता पार्टीने केली होती. मात्र या मोर्चासाठी दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरीही जंतरमंतर परिसरात सुमारे 10 हजारांहून अधिक कार्यकर्ते एकत्र आल्याची माहिती समोर आली आहे. आंदोलन शांततेत पार पडेल आणि कोणताही कार्यकर्ता अनुचित कृत्य करणार नाही, असा दावा पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी यापूर्वी केला होता.

दरम्यान, अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आंदोलनस्थळी दगडांनी भरलेला डम्पर आणि काचा फुटलेली एक कार उभी असल्याचा दावा केला आहे. त्यांनी या पोस्टमध्ये प्रश्न उपस्थित करत, शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर दगडफेक घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू आहे का, असा सवाल केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे.

CJP Protest | दिल्ली पोलिसांवर कटाचा आरोप :

दुसऱ्या पोस्टमध्ये अभिजीत दीपके यांनी दिल्ली पोलिसांवर आणखी गंभीर आरोप करत, आंदोलनस्थळी आधीच दगडांनी भरलेला ट्रक आणि नादुरुस्त वाहन ठेवण्यात आल्याचा दावा केला. पुढे माध्यमांमध्ये आंदोलकांनीच या वाहनांची तोडफोड केल्याचे दाखवले जाईल, असा आरोपही त्यांनी केला आहे.

कॉकरोच जनता पार्टीने या संपूर्ण प्रकाराला आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा केला आहे. मात्र या आरोपांबाबत दिल्ली पोलिसांकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. दरम्यान, जंतरमंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असून परिस्थितीवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

News Title: CJP Alleges Stone Truck Conspiracy

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now