प्रतिसादाअभावी सिडकोची 6 हजार घरे शिल्लक; घरांचं विक्री धोरण बदलणार?

On: February 10, 2025 9:41 AM
CIDCO Housing Scheme
---Advertisement---

CIDCO Housing Scheme l विविध कारणांमुळे सिडकोच्या (CIDCO) घरांना हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. 2018 ते 2022 या चार वर्षांत सिडकोने बांधलेली 6,000 घरे विक्रीविना पडून आहेत. त्यामुळे हजारो कोटींची गुंतवणूक (Investment) अडकून पडली आहे. परिणामी, शिल्लक राहिलेली जुनी घरे विकण्यासाठी पारंपरिक धोरणात (Traditional Policy) शिथिलता आणण्याच्या दृष्टीने सिडकोने चाचपणी सुरू केली आहे.

सिडकोची आर्थिक कोंडी :

गृहनिर्माण योजनेअंतर्गत (Housing Scheme) सिडकोने विविध नोडमध्ये (Node) 19 ठिकाणी 87 हजार घरे बांधण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी 30 हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. 2018 ते 2022 या कालावधीत विविध गृहयोजना जाहीर केल्या. त्यात अनेक यशस्वी अर्जदारांनी घराचा एकही हप्ता भरला नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात घरे शिल्लक आहेत.

शिल्लक घरे विकली जात नसतानाच, नवीन घरांच्या योजना जाहीर केल्या जात आहेत. नवीन योजनांतील घरांनाही फारसा प्रतिसाद मिळत नाही.
नवीन घरांना प्रतिसाद नाही आणि शिल्लक राहिलेली जुनी घरे विकली जात नाहीत, त्यामुळे सिडकोची आर्थिक कोंडी झाली आहे.

CIDCO Housing Scheme l सिडकोच्या विक्री धोरणातील संभाव्य बदल:

कुटुंबात एकाच्या नावे घर असेल तरी सिडकोचे दुसरे घर घेता येत नाही. परंतु, यात बदल करून दुसरे घर खरेदी करण्याची मुभा दिली जाणार आहे. ही सूट फक्त सिडकोच्या शिल्लक घरांनाच लागू असेल.

घरांच्या मूळ किमतीत कोणतीही वाढ न करण्याचा प्रस्ताव आहे. इतर जाचक अटी आणि शर्ती शिथिल करण्याच्या दृष्टीने विचारविनिमय सुरू असल्याचे समजते.

तळोजा नोडमध्ये सर्वाधिक घरे :

तळोजा नोडमध्ये सर्वाधिक म्हणजेच जवळपास 25 हजार घरे बांधली जात आहेत. एकूण शिल्लक घरांपैकी सुमारे पाच हजार घरे एकट्या तळोजा नोडमधील आहेत. अनेक उपाययोजना करूनही येथील घरे विकली जात नसल्याने सिडकोची डोकेदुखी वाढली आहे.

विशेष योजनांनाही प्रतिसाद नाही :

कोविड योद्धे (Covid Warriors), पोलिस कर्मचारी (Police Personnel), महापालिका आणि इतर तत्सम शासकीय प्राधिकरणांतील कर्मचाऱ्यांसाठी आठ ते नऊ विशेष योजना जाहीर केल्या. मात्र, त्यानंतरही या घरांना ग्राहक मिळाला नाही.

News title : CIDCO’s 6,000 Houses Remain Unsold Due to Lack of Response; Considering Changes in Sales Policy

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now