Christian Oliver | धक्कादायक बातमी! बड्या अभिनेत्याचा दोन चिमुकल्या मुलींसह विमान अपघातात मृत्यू

On: January 6, 2024 10:54 AM
Christian Oliver
---Advertisement---

Christian Oliver | हॉलिवूडमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेता ख्रिश्चन ऑलिव्हर (Christian Oliver) आणि त्याच्या दोन मुलींचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांचं विमान टेक ऑफ केल्यानंतर लगेचच कॅरेबियन समुद्रात पडलं. ऑलिव्हर जॉर्ज क्लूनीसोबत “द गुड जर्मन” आणि 2008 च्या अॅक्शन-कॉमेडी “स्पीड रेसर” मध्ये मोठ्या पडद्यावर दिसला.

Christian Oliver चा विमान अपघातात मृत्यू

क्रिश्चियन ओलिव्हर 51 वर्षांचा होता. ख्रिश्चन ऑलिव्हर (Christian Oliver) आणि त्याच्या दोन मुलींच्या मृत्यूमुळे कुटुंबाला आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. जगभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

रॉयल सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स पोलिस दलाने त्याच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, घटनेनंतर मच्छीमार, गोताखोर आणि तटरक्षक तातडीने घटनास्थळी पोहोचले, तेथून चार मृतदेह बाहेर काढण्यात आले. 51 वर्षीय ऑलिव्हर, त्याच्या दोन मुली मदिता, अॅनिक आणि पायलट रॉबर्ट सॅक्स अशी मृतांची नावे आहेत.

‘ती’ ठरली शेवटची  पोस्ट

गुरुवारी दुपारी काही वेळाने हे विमान ग्रेनेडाइन्समधील बेक्विआ या छोट्या बेटावरून सेंट लुसियाकडे निघालं होतं. असं मानलं जातं की अभिनेता त्याच्या कुटुंबासह सुट्टीवर होता. काही दिवसांपूर्वी, ऑलिव्हरने इंस्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आणि कॅप्शनमध्ये लोकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

ऑलिव्हरच्या कारकिर्दीबद्दल सांगायचं तर, तो 60 हून अधिक चित्रपट आणि टीव्ही शोचा भाग होता. ज्यामध्ये टॉम क्रूझच्या “वाल्कीरी” चित्रपटातील एक छोटी भूमिका देखील त्याने केली होती.

त्याने कारकिर्दीच्या सुरुवातीच्या भूमिकांमध्ये टीव्ही मालिका “सेव्ह बाय द बेल: द न्यू क्लास” आणि “द बेबी-सिटर्स क्लब” या चित्रपटात काम केलं होतं. त्याने दोन सीझनसाठी लोकप्रिय जर्मन-भाषेतील शो “Allarm für Cobra 11” मध्ये देखील काम केलेलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Stadium मध्ये अंडरवेअरचा खजिना अन् घाणीचे साम्राज्य; BCCI कारवाई करणार?

TATA च्या चौथ्या इलेक्ट्रिक कारची एन्ट्री; Punch.ev चे 4 रंग, जाणून घ्या सर्वकाही

Credit Card l क्रेडिट कार्ड लिमिट वाढवायचयं? तर या टिप्स फॉलो करा

Health Updates l रिकाम्या पोटी चहा पिण्याचे हे आहेत दुष्परिणाम; नक्की वाचा

Ram Mandir | २२ तारखेलाच बाळाचा जन्म व्हायला हवा; गर्भवती महिलांची मागणी

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now