‘त्यांची हे समजायची कुवतच नाही’; चित्रा वाघ यांनी अंधारेंना सुनावलं

On: February 14, 2023 2:27 PM
Sushma Andhare
---Advertisement---

मुंबई | निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप (BJP) नेत्यांचे महाराष्ट्र दौरे वाढत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. दरम्यान शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी हल्लाबोल केला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिवसेनेची धास्ती घेतल्यामुळे मोदी आणि शाह यांचे मुंबईतील दौरे वाढले आहेत. धास्तीमुळे कंठ घोष केला जात आहे. त्यांनी सतत दौरा करण्यापेक्षा मुंबईत 2 BHKचा फ्लॅट घ्यावा आणि इथं राहावं, असं सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी म्हंटलंय.

सुषमा अंधारेंच्या टीकेला भाजप नेत्यांनी प्रत्युत्तर दिलं. भाजप महिला अध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विट करत सुषामा अंधारे यांना चांगलंच सुनावलं आहे.

विनाशकाले विपरीत बुद्धी सुषमा अंधारे गरळ ओकायची म्हणजे किती त्याला काही मर्यादा? आम्ही घरात बसून राहणारे नाही, असं सुषमा अंधारे म्हणाल्यात.

दरम्यान, आम्हाला जनतेत राहायला आवडतं, जनतेसोबत संवाद हाच आमचा परमोच्च आनंद! पण ज्यांचं सरकार कधी घराबाहेर पडलच नाही, त्यांची हे समजायची कुवतच नाही, असं त्यांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now