‘मोठ्ठ्या ताई तुमची चॉईसच वेगळीये’; चित्रा वाघ यांनी सांगितली सुप्रिया सुळेंची चॉईस

On: October 12, 2023 2:28 PM
---Advertisement---

मुंबई | भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर टीका केली आहे. सुप्रिया सुळेंची चॉईस वेगळी आहे म्हणत चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सुप्रिया सुळेंची चॉईस सांगितली. चित्रा वाघ यांनी त्यांच्या सोशल मीडियावर अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी सुप्रिया सुळेंवर सडकून टीका केलीये.

राज्याच्या मोठ्ठ्या ताई सुप्रियाताईंना 100 कोटी वसुली करून देणारा गृहमंत्रीच आवडत असेल तर त्याला महाराष्ट्र तरी काय करणार? गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणारा गृहमंत्री तुम्हाला आवडणार नाहीच. महिलांच्या बेपत्ता प्रकरणात संपूर्ण देशातील आणि अगदी महाविकास आघाडी काळातील परिस्थिती सभागृहात सांगून तुमचे समाधान होणार नाही, अशी टीका चित्रा वाघ यांनी केलीये.

तुम्हाला रस फक्त 100 कोटीत आहे. मग ते एकरी वांग्यातून असो किंवा ते वसुली करून देणारा गृहमंत्री, तुम्हाला काय हवं?. तुमची चॉईस वेगळी आहे त्याला महाराष्ट्र तरी काय करणार महाराष्ट्राच्या मोठ्ठ्या ताई?, असा टोला चित्रा वाघ यांनी सुळेंनी लगावला आहे.

दरम्यान, भंडाऱ्याच्या घटनेवरून देखील चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंना सुनावलं होतं. राज्यातील आमच्या भगिनी तुमच्यासारख्या एकरी 100 कोटींची वांगी नाही ना पिकवू शकत ताई. नवीन जन्माला येणाऱ्या मुलीला 1 लाख 1 हजार रूपये मिळणार आहेत तर तुमच्या का पोटात दुखतयं ती लखपती होत असेल तर तुमच्या करोडपतीपणावर थोडीचं कुणी आघात करतंय, असं चित्रा वाघ म्हणाल्यात.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now