‘मला काहीही बोला पण…’; पॉर्न फिल्मवरुन चित्रा वाघ, अंधारेंमध्ये जुंपली

On: May 3, 2024 8:38 PM
Chitra wagh reply to Sushma Andhare
---Advertisement---

Chitra wagh | देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मात्र, राज्यात एका मुद्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवसेना उबाठा पक्षाकडून महिला अत्याचारासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून या जाहिरातीमध्ये पॉर्न फिल्ममधील कलाकार घेतल्याने एकच वाद रंगला आहे.

भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी या प्रकरणावरून शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. तर, ठाकरे गटाकडून सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिल आहे. ‘पॉर्न इंडस्ट्री आपल्याकडे नाही , चित्राबाई पॉर्न फिल्म बघत असतील’, अशी टीका अंधारे यांनी केली होती. या टीकेलाच आता चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“मी काय बघते, काय बघत नाही, यापेक्षा मी विचारलेला प्रश्न खरा आहे की खोटा ते सांगा. मला काहीही बोला, पण तो ऍक्टर पॉर्न स्टार आहे की नाही ते सांगा.”, असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत. तसंच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे ज्यांच्या मांडीवर बसले त्यांचे सरकार कर्नाटकात आहे, अशी टीकाही चित्रा वाघ यांनी केलीये.

सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्या होत्या?

“भाजपच्या आक्रस्थळे बाईने काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला आहे. आधी तीर मारायचा आणि नंतर वर्तुळ करायचं, अशी त्यांची सवय आहे. आधी नितेश राणे यांनी असाच प्रयत्न केला होता.पॉर्न इंडस्ट्री आपल्याकडे नाही, चित्राबाई (Chitra wagh) पॉर्न फिल्म बघत असतील, आधी आपल्या पक्षाचा सल्ला घ्या. अर्धवट माहिती घेवून बोलायचा प्रयत्न त्यांनी केला आहे.”, असं अंधारे म्हणाल्या होत्या.

इतकंच नाही तर, कोणतीही राजकीय जाहिराती बनवत असताना प्रोडक्शन हाऊसकडून रेकॉर्ड चेक केलं जातं. ते भारत सरकारकडून सेन्सॉर होत असतात. माझं याचं ज्ञान कमी आहे, चित्रा वाघ यांचं पॉर्न व्हिडिओचं ज्ञान अगाध असावं किंवा त्या पारंगत असाव्यात. असंही सुषमा अंधारे म्हणाल्या होत्या.

नेमकं प्रकरण काय?

ठाकरे गटाने महिला अत्याचाराच्या संबंधीत एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे.जाहिरातीमधील कलाकार हा पॉर्न स्टार असून त्याने उल्लू अॅपमधील वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. त्यात हा कलाकार महिलांचे शोषण करतो, असा दावा भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला होता. तसेच अशा कलाकाराला जाहिरातीमध्ये घेऊन त्यांनी महिला अत्याचारावर जाहिरात कशी केली?, असा सवालही चित्रा वाघ (Chitra wagh) यांनी केला. त्यावर सुषमा अंधारे यांनीही प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे आता अंधारे आणि वाघ यांच्यात वाद निर्माण झाला आहे.

News Title : Chitra wagh reply to Sushma Andhare

महत्त्वाच्या बातम्या-

कोपर्डी बलात्कार प्रकरणात नवा ट्विस्ट; …त्याला स्मशानभूमीत रात्रभर नग्न बसवले

मोठी दुर्घटना! हेलिकॉप्टर झालं क्रॅश; सुषमा अंधारे अन् पायलट…

काँग्रेसचं ठरलं! राहुल गांधी निवडणुकीच्या रिंगणात; या दोन गोष्टींमुळे गांधींचं पारडं जड राहणार

धक्कादायक… ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांवर हल्ला

या राशीच्या व्यक्तींनी सावधान; मित्रांशी मतभेदाची शक्यता

Join WhatsApp Group

Join Now