Chitra Wagh | दिशा सालियान (Disha Salian) यांच्या मृत्यू प्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्यांच्या मुलीने आत्महत्या केली नसून, बलात्कारानंतर तिची हत्या करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. या याचिकेत शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावरही आरोप करण्यात आल्याने राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे.
विधानसभेत सरकार-विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी
या मुद्द्यावरून विधानसभेत आणि विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद झाल्याचे पाहायला मिळाले. विधान परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी दिशाच्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्या विरोधात प्रस्ताव सादर केला.
यावर प्रत्युत्तर देताना शिवसेना (UBT) नेते अनिल परब (Anil Parab) म्हणाले, “आदित्य ठाकरेंची केस पाच वर्षांपासून कोर्टात आहे. जर त्यांचा या प्रकरणाशी संबंध असेल, तर न्यायालय योग्य तो निर्णय घेईल. मात्र, सरकार केवळ निवडक प्रकरणांवरच चर्चा करत आहे. संजय राठोड (Sanjay Rathod) आणि जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या प्रकरणांवर का गप्प बसता?”
चित्रा वाघ यांची मागणी –
अनिल परब यांच्या वक्तव्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आक्रमक झाल्या. त्यांनी विधानसभेत सांगितले की, “दिशा सालियानच्या वडिलांनी स्वतः पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. त्यामुळे एसआयटी (SIT) चा अहवाल समोर आणावा. सत्य जनतेसमोर आले पाहिजे, जे खरं आहे ते स्पष्ट झालं पाहिजे.”
त्यावर काही विरोधकांनी चित्रा वाघ यांना संजय राठोड यांच्याबद्दल काय भूमिका घेतली याबाबत प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना वाघ म्हणाल्या, “मी जे करायचं होतं ते केलं. जे काही पुरावे मिळाले, त्यावर मी लढले.” विधानसभेत चित्रा वाघ आक्रमक – “आम्हाला हलक्यात घेऊ नका”
दिशा सालियान (Disha Salian) मृत्यू प्रकरणावरून महाराष्ट्र विधानसभेत मोठा गदारोळ पाहायला मिळाला. भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि शिवसेना (UBT) नेते अनिल परब (Anil Parab) यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली.
“चित्रा वाघ ५६ पायाला बांधून फिरते”
अनिल परब यांनी विधानसभेत टीका करत म्हटले, “संजय राठोड (Sanjay Rathod) यांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी क्लीनचीट दिली. अनिल परब यांनी उद्धव ठाकरेंना विचारायला हवं की ती क्लीनचीट का दिली? चित्रा वाघसुद्धा तुमच्यासारखे ५६ पायाला बांधून फिरते.”
यावर चित्रा वाघ आक्रमक झाल्या आणि त्यांनी परब यांना प्रत्युत्तर देत म्हटले, “मी कुणाच्या वशिल्याने राजकारणात आले नाही. माझ्या जातीची व्यक्ती नसतानाही मी लढा दिला. माझ्या कुटुंबाने प्रचंड संकटं सहन केली. पण तरीही आम्ही लढतच राहिलो. काही उरले नाही, की माझ्या नवऱ्याबद्दल बोलायला सुरुवात केली जाते. आम्हाला हलक्यात घेऊ नका, आम्ही जर बोलायला लागलो तर तुमच्या खुर्च्या हलतील.”






