लोकांची लायकी नाही!, मराठी अभिनेत्री गौतमी देशपांडे ‘या’ कारणामुळे लोकांवर चिडली

On: April 23, 2024 5:27 PM
Gautami Deshpande
---Advertisement---

Chinmay Mandlekar | मराठी मनोरंजनसृष्टीमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक ट्विस्ट घडताना दिसत आहे. काल परवा मराठी अभिनेते चिन्मय मांडलेकरने (Chinmay Mandlekar) छत्रपती शिवजी महाराज यांची भूमिका न करण्याचा निर्णय घेतला. चिन्मयच्या मुलाचं नाव हे जहांगीर आहे. यामुळे त्याला आणि त्याच्या कुटुंबाला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. यामुळे चिन्मय मांडलेकरने (Chinmay Mandlekar) महाराजांची भूमिका करणार नसल्याचं सांगितलं.

चिन्मयने एका ठिकाणी मुलाखतीत बोलत असताना माहिती दिली होती. त्यावेळी माझ्या मुलाचं नाव हे जहांगीर असल्याचं चिन्मयने मुलाखतीत सांगितलं. तेव्हापासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला ट्रोल करण्यात आलं. चिन्मयची पत्नी नेहाने नेटकऱ्यांना प्रत्युत्तर म्हणून एक पोस्ट केली होती. आम्ही देश सोडून जायला काय इंग्रज नाही, अशा शब्दात तिनं नेटकऱ्यांना सुनावलं होतं. (Chinmay Mandlekar)

दरम्यान, अभिनेता चिन्मय मांडलेकरने (Chinmay Mandlekar) आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणार नसल्याचा निर्णय घेतला. त्याचा हा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहे. यावेळी आता त्याला अनेक कलाकारांनी पाठिंबा दिलाय. अशातच आता मराठी अभिनेत्री गौतमी देशपांडेनं इंन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली असून चिन्मय मांडलेकरला पाठिंबा दिलाय. तिनं त्या पोस्टमधून ट्रोलर्सला सुनावलंय.

गौतमी देशपांडेची पोस्ट व्हायरल

“कलाकारांना अशा प्रकारची वागणूक देताय का? असं सॉफ्ट टार्गेट बनवायचं असेल तर लोकांना काही चांगलं मिळण्याची लायकी नाही. हे पाहूण अतिशय वाईट वाटलं. हे असं व्हायला नको होतं. चिन्मय दादा आमचा तुला पाठिंबा आहे,” असं गौतमीने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

gau chinmat 2024041217326

व्हिडीओ व्हायरल

मुलाचं नाव जहांगीर आहे. यामुळे अनेक नेटकऱ्यांनी त्याला आणि त्याच्या कुटुंबाला ट्रोल केलं. त्याच्या पत्नीलाही ट्रोल करण्यात आलं. त्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मला शिवरायांच्या भूमिकेमुळे लाखो मुलांचं प्रेम मिळालं. मात्र यामुळे माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

माझ्या मुलाचा जन्म हा 2013 रोजी झाला. तेव्हा नाही कोणी ट्रेल केलं. आता ट्रोल करायला सुरूवात केली. छत्रपती शिवरायांची क्षमा मागून मी भूमिका करण्यापासून रजा घेत असल्याचं त्यांनी व्हिडीओतून सांगितलं.

News Title – Chinmay Mandlekar Support Actress Gautami Deshpande

महत्त्वाच्या बातम्या

अमित शहांच्या सभेआधी मोठा राडा, बच्चू कडू थेट पोलिसांना भिडले

“पार्थला भाऊ म्हणून सांगतो…”, रोहित पवारांचा उपरोधिक टोला

“मंगळसूत्र कशासाठी?…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

हार्दिक पांड्या T20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाच्या अडचणी वाढवू शकतो!

घराबाहेर झालेल्या गोळीबारानंतर सलमान खानने घेतला सर्वात मोठा निर्णय!

Join WhatsApp Group

Join Now