गुप्तांगावर लिंबू पिळला, पत्नीवर कोयत्याने वार; पुण्यातील घटनेने खळबळ

On: April 14, 2025 10:42 AM
Crime News
---Advertisement---

Chinchwad | चिंचवड परिसरात घरखर्चासाठी पैसे मागितल्याच्या कारणावरून पतीने पत्नीवर कोयत्याने वार करून आणि गुप्तांगावर लिंबू पिळून जादूटोणा करण्याची धमकी देत अमानुष अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून पतीविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri police station) गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

घरगुती वादातून पतीचे अघोरी कृत्य

पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे निलख (Pimple Nilakh) भागातील विशाल नगर-जगताप धायगुडे वसाहतीत (Vishal Nagar-Jagtab Dhaygude Colony) ही घटना ११ जून २०२४ रोजी घडली. ३९ वर्षीय पीडित महिलेने ४१ वर्षीय पतीकडे घरखर्चासाठी पैशांची मागणी केली असता, त्याने तिच्यावर हल्ला केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जून रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास दोघांमध्ये वाद झाला, ज्यानंतर पतीने पत्नीच्या गळ्याला कोयता लावून गंभीर इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला.

यापूर्वी पीडित महिलेने पतीपासून विभक्त राहण्याचा आणि घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. दरम्यान, १ जून रोजी पतीने घरातील वस्तू हलवल्या होत्या. पीडिता मुलांचे कपडे व पुस्तके आणण्यासाठी फ्लॅटवर गेली असता, मद्यधुंद पतीने तिला शिवीगाळ करत घरात कोंडून घेतले. त्याने तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आणि घटस्फोटाची नोटीस मागे घेण्यासाठी दबाव टाकला.

जादूटोण्याची धमकी आणि मदतीचे आवाहन

केवळ मारहाण आणि अत्याचारावरच पती थांबला नाही, तर त्याने पीडितेच्या गुप्तांगावर हळद-कुंकू लावून लिंबू पिळले. असे करून तो तिच्यावर जादूटोणा करेल, अशी भीती त्याने घातली. या संपूर्ण प्रकारानंतर अत्यंत घाबरलेल्या पीडित महिलेने अखेर पिंपरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन पतीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

या घटनेमुळे पीडित महिला मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या खचली आहे. ‘माणुसकीच्या नात्याने कासगिरी’ या योजनेअंतर्गत तिला आर्थिक मदत मिळवून देणे आवश्यक आहे. यासाठी पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ते दीपक काळभोर (Deepak Kalbhor) यांच्याकडे सामाजिक आणि आर्थिक मदतीची मागणी केली आहे, जेणेकरून पीडितेला या कठीण परिस्थितीतून सावरण्यासाठी आधार मिळू शकेल.

Title : Chinchwad Man Assaults Wife Over Household Expenses

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now