बंपर लॉटरी! फक्त कर्मचारीच नव्हे, तर इंटर्ननाही मिळणार iPhone 17 Pro Max, ‘या’ कंपनीची घोषणा

On: September 26, 2025 3:19 PM
Iphone 17 Pro Max Employees Gift |
---Advertisement---

Iphone 17 Pro Max Employees Gift | | नुकताच ॲपल (Apple) ने आपला अत्याधुनिक iphone 17 Pro Max लॉन्च केला असून, जगभरात या मोबाईलची मोठी चर्चा रंगली आहे. भारतात तर ॲपल (Apple) स्टोअरच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं. दरम्यान, चीनमधील ‘मीडियास्टॉर्म’ या लोकप्रिय मीडिया कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना आनंदाचा ठेवा दिला आहे. कंपनीचे सीईओ टिम पैन यांनी प्रत्येक कर्मचाऱ्याला iphone 17 Pro Max गिफ्ट रुपात दिला असून, यामध्ये इंटर्नपासून ते नुकतेच रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. (Iphone 17 Pro Max Employees Gift)

या निर्णयामुळे कंपनीतील वातावरण आनंदी झाले असून, कर्मचारी आपल्या बॉसच कौतुक करत आहेत. सोशल मीडियावरही या निर्णयाची जोरदार चर्चा होत असून अनेकांनी टिम पैन यांना जगातील ‘सर्वोत्तम बॉस’ अशी उपमा दिली आहे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या आवडीनुसार iphone 17 Pro Max चा रंग निवडण्याची संधी मिळाली आहे.

कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न :

मिडियास्टॉर्म ही प्रॉडक्ट रिव्ह्यू आणि ब्लॉगिंग क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. व्हिडिओ स्ट्रीमिंग व शेअरिंग प्लॅटफॉर्म Bilibili वर त्यांचे तब्बल १.२ कोटींहून अधिक फॉलोवर्स आहेत. अशा प्रतिष्ठित कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेली ही भेट फक्त आकर्षक गिफ्ट नसून कर्मचाऱ्यांच्या मेहनतीला दिलेल प्रोत्साहन आहे.

सोशल मीडियावर कर्मचारी ‘Fyjdreaming’ यांनी केलेल्या पोस्टनंतर ही बातमी जगभरात व्हायरल झाली. त्यांनी सांगितले की, ॲपल (Apple) च्या कॅलिफोर्नियातील लॉन्च इव्हेंट मध्ये ते सहभागी झाले होते. त्या इव्हेंटमध्ये असताना त्यांना टिम पैन यांचा संदेश मिळाला. “नेहमीप्रमाणे, प्रत्येकाला iphone 17 Pro Max मिळणार आहे. इंटर्न असाल किंवा नवीन भरती झालेले असाल, सर्वांनाच हा फोन मिळेल असा संदेश होता” यामुळे कर्मचारी आनंदी झाले.

Iphone 17 Pro Max Employees Gift | कंपनीने फोनवरील कर स्वतः भरण्याची दर्शवली तयारी :

कंपनीने यासोबत iphone 17 Pro Max खरेदीसाठी लागणारा कर स्वतः भरण्याची तयारीही दर्शवली आहे. यापूर्वी २०२४ मध्ये देखील टिम पैन यांनी त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना iphone 16 Pro आणि ॲपल वॉच (Apple watch) भेट म्हणून दिले होते. त्यामुळे हे त्यांच्या उधार स्वभावच आणखी एक ठोस उदाहरण ठरले.

iPhone 17 सिरीजची किंमत चीनमध्ये वेगवेगळी आहे. यामध्ये iphone 17 साधारण ७४,४८२ रुपयांना, iphone Air जवळपास ९९,३१३ रुपयांना, iphone 17 Pro सुमारे १,११,७२९ रुपयांना तर iphone 17 Pro Max तब्बल १,२४,१४४ उपलब्ध आहे.

News title : China Mediastorm Will Gift Iphone 17 Pro Max To All Employees 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now