Shivaji Maharaj Temple | भिवंडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या पहिल्या मंदिराचे उद्घाटन मोठ्या दिमाखात पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते या मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. किल्ल्याच्या धर्तीवर उभारलेले हे मंदिर शिवप्रेमींसाठी एक ऐतिहासिक ठिकाण ठरणार आहे. (Shivaji Maharaj Temple )
मंदिराची वैशिष्ट्ये आणि भव्य रचना
साडेसहा फूट उंचीची छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती
प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज (Arun Yogiraj) यांचे उत्कृष्ट शिल्पकलेचे काम
2,500 चौरस फुटांमध्ये उभारलेले मंदिर, 5,000 चौरस फुटांची तटबंदी
मंदिराभोवती बुरूज, महाद्वार आणि 42 फुटांचे प्रवेशद्वार
गोलाकार बुरूज आणि टेहळणी मार्ग, शिवरायांच्या जीवनप्रसंगांवर आधारित शिल्पे
तुळजाभवानी देवी आणि राजमाता जिजाऊ यांचेही मंदिर समाविष्ट
उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी देव, देश आणि धर्मासाठी लढा दिला. त्यांच्या योगदानाशिवाय आपण आज हिंदू म्हणून उभे राहू शकलो नसतो. हे मंदिर म्हणजे फक्त एक पूजास्थळ नसून, एक प्रेरणास्थान आहे.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवक्षेत्र मराडे पाडा, भिवंडी येथे ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर (शक्तिपीठ) परिसरा’चे लोकार्पण केले. यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, आ. किसान कथोरे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.@Dev_Fadnavis @KapilPatil_ @mikisankathore… pic.twitter.com/DAwwe280nh
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 17, 2025
7-8 कोटी रुपये खर्च
मंदिराच्या उभारणीसाठी 7 ते 8 कोटी रुपये खर्च झाले असून त्यातील शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट आणि काही भाग लोकवर्गणीतून उभारण्यात आला आहे. वास्तुविशारद विजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या मंदिराची संकल्पना साकारली आहे.
Title : Chhatrapati Shivaji Maharaj Temple Inaugurated in Bhiwandi






