Maratha Reservation | सरकारकडून जरांगेंच्या मागण्या मान्य; छगन भुजबळांनी घेतला मोठा निर्णय

On: January 27, 2024 2:14 PM
Chhagan Bhujbal
---Advertisement---

Maratha Reservation | सगेसोयरेसह मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्या प्रमुख तीनही मागण्या मान्य झाल्या आहेत. सरकारच्या या निर्णयावर मंत्री छगन भुजबळांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. हा अध्यादेश नाही ड्राफ्ट आहे, नोटिफिकेशनचा मसुदा आहे. 16 तारखेपर्यंत हरकती घेऊ, असं म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती.

छगन भुजबळांनी घेतला मोठा निर्णय

छगन भुजबळ यांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. मराठा समाजाच्या (Maratha Reservation) मागण्या मान्य करण्याचा अध्यादेश दिल्यानंतर भुजबळ यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. रविवारी छगन भुजबळ यांनी मुंबईत (Mumbai) सर्वपक्षीय ओबीसी नेते आणि विविध संघटना पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.

नाशिकमध्ये महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक परिषद आणि कृषी प्रदर्शनाला छगन भुजबळ उपस्थित राहणार होते. मात्र त्यांनी आता सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.

झुंडशाहीने नियम कायदे बदलता येत नाही- छगन भुजबळ

मराठा समाजाचा विजय झाला असं मला वाटत नाही. अशारितीने झुंडशाहीने नियम कायदे बदलता येत नाही. समता परिषदेच्या माध्यमातून याचा विचार करु आणि योग्य कारवाई करु. हे सगेसोयरे कायद्याच्या कसोटीवर अजितबात टिकणार नाहीत असं माझं मत आहे, असंही ते म्हणालेत.

मराठा समाजाच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे की, ओबीसीच्या 17 टक्के आरक्षणात येण्यात तुम्ही जिंकलात असे तुम्हाला वाटत आहेत. या 17 टक्क्यांमध्ये सगळे लोक येतील. इडब्ल्यूएसच्या आधारे तुम्हाला दहा टक्के आरक्षण मिळत होतं. ते यापुढे मिळणार नाही. खुल्या गटातील जे आरक्षण होतं ते सुद्धा आता मिळणार नाही. तुम्हाला 50 टक्क्यांमध्ये संधी होती. ती संधी गमावली. आता 374 जातींसाठी असलेल्या 17 टक्के आरक्षणासाठी तुम्हाला झगडावं लागेल, असं भुजबळ म्हणालेत.

दरम्यान, मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या आहेत. पण याच्या विरुद्ध निश्चित जे ओबीसी लोक आहेत ते कोर्टात जाणार हे निश्चित आहे. आणि मग ही लढाई पुढची कोर्टात होणार आहे, असं घटनातज्ज्ञ उल्हास बापटांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Maratha reservation GR | ‘…तरच मिळणार कुणबी प्रमाणपत्र’; जीआरमध्ये नेमकं काय म्हटलंय?

Manoj Jarange | मुख्यमंत्र्यांसमोरच मनोज जरांगे यांचं मोठं वक्तव्य!

Maratha Reservation | मराठा आरक्षणाची लढाई संपली नाही?; घटनातज्ज्ञ उल्हास बापटांचं मोठं वक्तव्य

Maratha Reservation | जरांगे पाटील यांच्या भाषणातील पाच प्रमुख मुद्दे, वाचा एकाच ठिकाणी

Manoj Jarange | “विजयाचं श्रेय माझ्या मराठा बांधवांचं, भविष्यात अडचणीवेळी पुन्हा उभा राहणार”

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now