छगन भुजबळ अजितदादांची साथ सोडणार? भुजबळांचं सूचक विधान होतंय तुफान व्हायरल

On: December 16, 2024 4:02 PM
Chhagan Bhujbal
---Advertisement---

Chhagan bhujbal l नागपूरमध्ये राजभवन येथे महायुती सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार पार पडला. यामध्ये महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी महायुतीत अनेक दिग्गज नेत्यांना मंत्रीमंडळात डच्चू देण्यात आला आहे. राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना देखील डावलण्यात आले आहे. यानंतर त्यांच्या नाराजीच्या चर्चेला उधाण आलं आहे.

जहां नहीं चैना वहां नहीं… भुजबळांचं वक्तव्य चर्चेत :

छगन भुजबळ यांना मंत्रिपद डावलल्याने ते प्रचंड नाराज आहेत. अशातच त्यांनी मीडियाशी बोलताना आपल्या मनातील खदखद देखील व्यक्त केली आहे. तुम्हाला मंत्रिपद मिळालं नाही. तुम्ही अधिवेशनात थांबणार नाही का? तुमची आता पुढची नेमकी काय भूमिका असणार? असे सवाल आमदार छगन भुजबळ यांना विचारण्यात आले.

या प्रश्नांवर छगन भुजबळांनी आपल्या स्टाईलने एकाच वाक्यात उत्तर दिलं आहे. आता बघू, जहां नहीं चैना वहां नहीं रहना असं म्हणत छगन भुजबळ यांनी सर्वात मोठं सूचक विधान केलं आहे. मात्र आता छगन भुजबळ यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक अर्थ लावले जात आहेत.

Chhagan bhujbal l भुजबळ अजितदादांची साथ सोडणार का? :

छगन भुजबळ नाराज असल्याने भुजबळ हे अजितदादांची साथ सोडणार असल्याचे संकेत या वक्तव्यातून मिळत आहेत. तसेच छगन भुजबळ पुन्हा शरद पवार यांच्या गटात जाणार असल्याच्या चर्चा देखील आता रंगल्या आहेत. त्यामुळे छगन भुजबळ पुढील काही दिवसात नेमका काय निर्णय घेतात? याकडे सर्व ओबीसी समाजासह राज्यच लक्ष लागलं आहे.

News Title : chhagan bhujbal now going to part ways with ajit pawar

महत्वाच्या बातम्या –

“आपण बिहारच्या मार्गाने चाललोय”; शिंदे गटाच्या ‘या’ नेत्यानं नेतृत्वावर केला हल्ला

मंत्रिपदापासून वंचित असलेले भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?, थेट म्हणाले…

राज्यातील तब्बल 17 जिल्हे मंत्रिपदापासून वंचित; पाहा त्या जिल्ह्यांची यादी

“जरांगेंना अंगावर घेतलं, त्याचं बक्षीस..”; मंत्रीमंडळात डावलल्यानंतर भुजबळांची प्रतिक्रिया

छगन भुजबळ होणार उपमुख्यमंत्री?, ‘या’ बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now