Prasanna Shankar | चेन्नईतील (Chennai) प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी रिपलिंगचे (Rippling) संस्थापक प्रसन्ना शंकर यांनी त्यांच्या पत्नीवर बेवफाईचे गंभीर आरोप लावत सोशल मीडियावर तिच्या खाजगी चॅट्स शेअर केले आहेत. त्यांनी पोलिसांवरही अवैधरीत्या पाठलाग केल्याचा आरोप करत आपली बाजू समाजमाध्यमांवर मांडली आहे.
पत्नीच्या अफेअरचे पुरावे सादर
प्रसन्ना शंकर यांनी सोशल मीडियावर सांगितले की, त्यांना त्यांच्या पत्नीचा दिव्या अनूप (Divya Anoop) नावाच्या व्यक्तीसोबत गेल्या सहा महिन्यांपासून अफेअर असल्याचे कळाल्यानंतर त्यांनी घटस्फोटाची प्रक्रिया सुरू केली. यासंदर्भात त्यांनी काही चॅटचे स्क्रीनशॉटही एक्स (पूर्वी ट्विटर) या प्लॅटफॉर्मवर शेअर केले. या चॅटमध्ये दिव्या अनूपला विचारते की, “तू एक्स-एल साइजचा कंडोम घेऊन येशील का?” असे खाजगी संवाद पाहायला मिळतात.
— Prasanna S (@myprasanna) March 23, 2025
या प्रकारानंतर त्यांनी पत्नीविरोधात घटस्फोटाची केस दाखल केली असून दोघांमध्ये त्यांच्या मुलाच्या कस्टडीवरूनही संघर्ष सुरू आहे. त्यांनी हेही नमूद केले की, चेन्नई पोलिस त्यांच्यावर सतत नजर ठेवत असून त्यांनी आपल्यावर अवैधरित्या गुप्तरीत्या नजर ठेवण्याचा आरोप केला आहे. पोलिसी कारवाईपासून बचाव करण्यासाठी ते सध्या पळून असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.
पत्नीवर अपहरण आणि खोट्या तक्रारींचे आरोप
प्रसन्ना यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या पत्नीने त्यांच्या नऊ वर्षांच्या मुलाचे अमेरिकेत अपहरण केले होते. त्यानंतर त्यांनी हे प्रकरण आंतरराष्ट्रीय कोर्टात नेले. कोर्टाचा निकाल त्यांच्या बाजूने लागल्यावर दोघांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. परंतु भारतात परत आल्यानंतर पत्नीने त्यांच्यावर पुन्हा केसमधून आरोप केले.
त्यांनी असेही सांगितले की, पत्नीने त्यांच्या विरोधात घरगुती हिंसेची खोटी तक्रार दाखल केली आणि अपहरणाच्या आरोपाखाली पोलिसांना गुंतवले. यामुळे रात्री उशिरा पोलिसांनी त्यांचे ठिकाण शोधून त्यांचा पाठलाग केला. परिस्थिती बिघडल्यामुळे त्यांनी आपल्या मुलासह तातडीने तिथून पलायन केल्याचे त्यांनी सांगितले.






