Sonakshi Sinha | अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) मोठ्या अडचणीत सापडली आहे. ‘दबंग गर्ल’ म्हणून सोनाक्षीला ओळखलं जातं. मात्र, आता तिच्याबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. तिच्या नावाने लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी सोनाक्षी आणि तिच्या मॅनेजरवर गुन्हा दखल करण्यात आला आहे. या दोघांवर अटॅचमेंटचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या प्रकरणात मॅनेजर मालविका पंजाबी व्यतिरिक्त धोमील ठक्कर आणि गर्ल शकरिया यांचे नाव घेतले जात आहे.
नेमकं प्रकरण काय?
मालविका पंजाबी , धोमील ठक्कर आणि गर्ल शकरिया यांनी सोनाक्षी सिन्हाच्या नावावर लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. याबाबत कोर्टात खटलाही सुरू आहे. सोनाक्षीला (Sonakshi Sinha) हायकोर्टाने 28 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती दिली आहे. या तीन जणांवर कलम 82 अन्वये कुर्कीचे आदेश देण्यात आले आहेत.
हे प्रकरण 2019 सालचे आहे. मुरादाबादचे रहिवासी प्रमोद शर्मा यांनी 22 फेब्रुवारी 2019 रोजी कटघर पोलिस ठाण्यात सोनाक्षी सिन्हा आणि इतरांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. प्रमोद शर्मा हे इव्हेंट मॅनेजर असून ते मुरादाबादच्या कटघर पोलिस स्टेशनच्या शिवपुरी कॉलनीतील रहिवासी आहेत. एका कार्यक्रमासाठी त्यांनी सोनाक्षी सिन्हाकडे वेळ मागितली होती.
View this post on Instagram
हा कार्यक्रम 30 सप्टेंबर 2018 रोजी दिल्लीत होणार होता, परंतु 36 लाख रुपये घेऊन सोनाक्षी सिन्हा आणि तिच्या सल्लागाराने शेवटच्या क्षणी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास नकार दिला. त्यांनी प्रमोद शर्मा यांच्याकडून संपूर्ण फी घेतली होती. याच प्रकरणी कटघर पोलिस ठाण्यात 22 फेब्रुवारी 2019 रोजी सोनाक्षी सिन्हासह पाच जणांविरुद्ध फसवणूक आणि गैरव्यवहाराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.
‘या’ दिवशी होणार पुढील सुनावणी
सोनाक्षी (Sonakshi Sinha) कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याने प्रमोद शर्मा यांनी भरलेली फी परत मागितली. मात्र अभिनेत्रीकडून, ती मिळालेली रक्कम परत करण्यास नकार आल्याने शर्मा यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. आता या सर्व प्रकरणावर 28 फेब्रुवारी सुनावणी होणार आहे.
News Title- Cheating case registered against Sonakshi Sinha in Moradabad
महत्त्वाच्या बातम्या –
“लोक फक्त यश मिळाल्यावर आपल्यासोबत असतात पण…”, बुमराहनं व्यक्ती केली खदखद
बेरोजगारीवरून काँग्रेसची टीका; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी थेट आकडेवारीच सांगितली!
आज मी आणखीच श्रीमंत झालो; 12th नापास IPS अधिकाऱ्याच्या भेटीने आनंद महिंद्रा भारावले
पूनम पांडेवर सरकार मोठी जबाबदारी सोपवणार? आरोग्य मंत्रालयाने दिली अपडेट
पंतप्रधान मोदींचे एक भाषण आणि सरकारी शेअर्स सुसाट; 24 लाख कोटींची कमाई






