मोठी बातमी! चंद्रकांत पाटील यांच्या गाडीचा अपघात

On: April 1, 2024 9:43 PM
Chandrakant Patil Accident
---Advertisement---

 Chandrakant Patil Accident | आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एक वाईट बातमी समोर येत आहे. शिंदे गटाचे आमदार चंद्रकात पाटील (Chandrakant Patil Accident) यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. चंद्रकांत पाटील यांना किरकोळ मार लागला आहे. ते किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.  (Chandrakant Patil Accident)

चंद्रकांत पाटील यांच्या गाडीचा अपघात

मुक्ताईनगरमध्ये फिरत असताना ही घटना घडली आहे. मुक्ताईनगरमध्ये आमदार चंद्रकांत पाटील फिरत होते. तेव्हा त्यांच्या बाजूला गाड्यांचा ताफा होता. त्यातील दोन गाड्या एकमेकांवर आदळल्याने सोमवारी ही दुर्घटना घडली आहे.

दोन पोलीस किरकोळ जखमी

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil Accident) यांच्यासोबत दोन पोलीस होते ते देखील किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्यावर सध्या खासगी रूग्णायलामध्ये उपचार सुरू आहेत. पोलीस व्हॅन आणि आमदारांच्या गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. (Chandrakant Patil Accident)

आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघाम सुरू आहे. कार्यकर्ते, नेते निवडणुकीच्या तोंडावर प्रचारासाठी तसेच आपल्या विभागाची, मतदारसंघाची, गावांची पाहणी करायला जातात. याचप्रमाणे चंद्रकांत पाटील हे देखील आपल्या मतदारसंघामध्ये गेले होते. त्यावेळी जुना कुंड रस्त्याने जात असताना हा धक्कादायक प्रकार घडला.

जुना कुंड रस्त्याने जात असताना चंद्रकांत पाटील शेतकऱ्यांना भेटण्यासाठी थांबले होते. त्यावेळी ताफ्यातील पोलिसांची गाडी ब्रेक न लागल्याने त्यांच्या चारचाकी वाहनावर आदळली आणि मोठी दुर्घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे.

 News Title – Chandrakant Patil Accident News Update

महत्त्वाच्या बातम्या

“कितीबी समोर येऊदे त्यांना…”, सुप्रिया सुळेंचं व्हॅट्सअॅप स्टेटस चर्चेत

“मी ईडीबिडीला घाबरत नाही…”, प्रणिती शिंदे पुन्हा कडाडल्या

IRCTC चं सर्वात भारी टूर पॅकेज; ‘5’ देश फिरा स्वस्तात

उन्हाच्या झळा वाढल्या, उष्माघातापासून ‘असा’ करा स्वतःचा बचाव

“जर तुम्हाला वहिनी आईसमान वाटते तर निवडणूक नका लढवू”

Join WhatsApp Group

Join Now