“राहुल शेवाळे महिलेला घेऊन परदेशात गेला होता, उद्धवसाहेबांनी ती भानगड मिटवली”

On: December 22, 2022 1:42 PM
---Advertisement---

औरंगाबाद | शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shevale) यांनी शिवसेना खासदार आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केलाय. ड्रग्स संदर्भातल्या चर्चेत मी सहभाग घेतला, सुशांत केस तपास माहिती जनतेला मिळायला हवी, असं शेवाळे म्हणालेत.

रिया चक्रवर्तीला जे कॉल आले होते ते AU यावरून आले होते, पण मुंबई पोलिसांनी त्याचा खुलासा केला नाही पण बिहार पोलिसांनी आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केलाय, म्हणून हा प्रश्न मी उपस्थित केला, असं राहुल शेवाळे म्हणाले. आता यावर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राहुल शेवाळे याची अनेक लफडी आहेत. हा एका महिलेला घेऊन परदेशात गेला होता. त्यावेळी याची बायको उद्धव साहेबांकडे रडत आली होती ती भानगड उद्धव साहेबांनी मिटवली होती, असं खैरे म्हणाले आहेत.

शेवाळेंनी केलेल्या आरोपांनंतर आमदार नितेश राणेंनी देखील आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजलीये.

सुशांत सिंह राजपूत केसचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा फक्त आदित्य ठाकरे यांचंच नाव का समोर येतं? दाल में जरूर कुछ काला है! आदित्य ठाकरे यांचा या केसशी संबंध आहे. त्यामुळे याची व्यवस्थित चौकशी व्हायला हवी, असं नितेश राणे म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now