शनीच्या राशीत वर्षाचं शेवटचं चंद्रग्रहण! ‘या’ ३ राशींना बसणार मोठा फटका

On: August 25, 2025 12:59 PM
Chandra Grahan 2025
---Advertisement---

Chandra Grahan | 2025 वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण 7 सप्टेंबर रोजी लागणार असून याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार हे चंद्रग्रहण शनीच्या कुंभ राशीत दिसणार आहे. चंद्रग्रहणाची सुरुवात रात्री 9 वाजून 58 मिनिटांनी होईल आणि मध्यरात्री 1 वाजून 26 मिनिटांनी याची समाप्ती होईल. विशेष म्हणजे हे ग्रहण भारतात स्पष्टपणे दिसणार असल्याने याचा थेट प्रभाव सर्व राशींवर पडणार आहे.

कर्क राशीवर चंद्रग्रहणाचा परिणाम :

चंद्रग्रहण हा खगोलशास्त्रीय दृष्ट्या आकर्षक पण ज्योतिषशास्त्रीय दृष्टीने संवेदनशील असा योग मानला जातो. या दिवशी अनेकांना मानसिक तणाव, आरोग्याशी संबंधित समस्या किंवा नातेसंबंधांमध्ये अडचणी जाणवू शकतात. मात्र विशेषतः तीन राशींना या काळात अधिक सावध राहण्याची गरज असल्याचं ज्योतिषतज्ज्ञ सांगतात.

कर्क राशीचा स्वामी ग्रह स्वतः चंद्र असल्याने ग्रहणकाळात या राशीच्या जातकांना जास्त त्रास जाणवू शकतो. मानसिक अस्वस्थता, सतत चिंता आणि नकारात्मक विचार मनात घोंगावत राहतील. अचानक नातेसंबंधात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. या काळात भगवान शंकराची उपासना आणि मंत्रजप करणं शुभ मानलं जातं. यामुळे मानसिक स्थैर्य लाभून संकटं कमी होऊ शकतात.

Chandra Grahan | कन्या आणि मीन राशींवर संकटाची छाया

कन्या राशीच्या जातकांसाठी हे चंद्रग्रहण सहाव्या चरणात होणार आहे. त्यामुळे नियोजित कामांमध्ये अडथळे येऊ शकतात. विरोधक सक्रिय होण्याची शक्यता आहे. आर्थिक संकट आणि पैशांची तंगी जाणवू शकते. त्यामुळे गुंतवणूक टाळणं आणि धार्मिक कार्यात सहभागी होणं हितावह ठरेल.

मीन राशीच्या द्वादश भावात हे ग्रहण लागणार आहे. त्यामुळे या काळात खर्चात वाढ होईल. आरोग्यासंबंधी अडचणी उद्भवू शकतात. चंद्रग्रहणाच्या वाईट परिणामांपासून वाचण्यासाठी योग, ध्यान आणि दान करणं (चांदी, दूध, पाणी) अत्यंत फायदेशीर ठरेल.

News Title : Chandra Grahan 2025: Last Lunar Eclipse of the Year in Aquarius; Negative Impact on Cancer, Virgo, Pisces Zodiac Signs

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now