राज्यात ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता, वाचा हवामान खात्याचा अंदाज

On: December 13, 2022 12:55 PM
---Advertisement---

मुंबई | बंगालच्या उपसागरात चक्रिवादळाची निर्मिती झाली आहे. परिणामी राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण तयार झालं आहे. त्यामुळं राज्याच्या किमान तापमानातही वाढ दिसून आली आहे.

हवामान विभागाच्या(Meteorology Department) अंदाजानुसार मंगळवारी मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पुण्यामध्येही ढगाळ वातावरण झालं आहे. त्यामुळं पुण्यातही तुरळक पाऊस(Rain Update) पडू शकतो, असा अंदाज आहे.

मंगळवारी कोकणातील रायगड,रत्नागिरी तसेच नगर, नाशिक, सातारा या जिल्ह्यांतही तुरळक स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. परंतु हे ढगाळ वातावरण निवळताच किमान तापमानात 2 ते 4 अंशाची घट होऊ शकते.

महाराष्ट्रात किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. धुळे आणि निफाडमध्ये तापमान 11 अंशावर पोहचले आहेत. काही राज्यांत सोमवारी किमान तापमान 16 ते 24 अंशाच्या दरम्यान होते.

सोमवारी पुण्यात कमाल तापमान 30.5 अंश से. तर किमान तापमान 20.8 अंश से. नोंदवले गेले. नाशिकमध्ये कमाल तापमान 30.3 अंश से. तर किमान तापमान 19.2 अंश से. नोंदवले गेले.

दरम्यान, मंगळवारी दक्षिण अंदमान समुद्रात नव्यानं चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होऊ शकते, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now