राज्यातील ‘या’ भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता!

On: April 12, 2023 4:52 PM
---Advertisement---

मुंबई | पुढच्या काही दिवसात राज्यात मुसळधार पाऊस (Rain) पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबई (Mumbai) वगळता राज्याच्या बहुतांश भागात मागील आठवड्याभरापासून पावसाच्या हलक्या सरी बरसत असल्याचं पाहायला मिळालं.

येणाऱ्या पाच दिवसातही हीच परिस्थिती पाहायला मिळणार असल्याच्या आयएमडीच्या (IMD) वृत्ताला हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दुजोरा देत याबाबत एक ट्विट केलं.

येणाऱ्या पाच दिवसांतही हीच परिस्थिती पाहायला मिळणार असल्याच्या आयएमडीच्या वृत्ताला हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दुजोरा देत एक ट्विट केलं.

दरम्यान, हवामान विभागाच्या वृत्ताचा हवाला देत होसाळीकर यांनी केलेल्या ट्विटनुसार पुढील 5 दिवस गोवा, कोरण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस हजेरी लावेल.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now