सिंहाकडून शिका ‘या’ गोष्टी, येईल भरपूर संपत्ती

On: April 2, 2024 7:26 PM
Acharya Chanakya
---Advertisement---

Chanakya niti | मनुष्याच्या जीवनाला समृद्ध करणारे एकमेव आचार्य म्हणजे आचार्य चाणक्य (Chanakya niti) होय. आचार्य चाणक्य (Chanakya niti) यांनी मानवाच्या कलागुणांवर भाष्य केलं आहे. प्रेम, माया यांबद्दल अनेकदा मार्गदर्शन केलं आहे. आचार्य चाणक्य (Chanakya niti) मानवाला आपल्या आय़ुष्यामध्ये सफल होण्यासाठी अनेक बाबी सांगतात.

मनुष्य हा देखील एक प्राणी आहे. एका प्राण्याला दुसऱ्या प्राण्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. त्याचप्रमाणे मनुष्याने आपल्या आयुष्यामध्ये प्राण्यांसोबत मैत्री करत अनेक गोष्टी प्राण्यांपासून शिकून घ्याव्यात. श्वानाला आपण इमानदारी प्राणी म्हणून संबोधतो. मात्र सध्या मनुष्य जातीमध्ये खरंच कोणी प्रामाणिक राहिलं आहे का? असा सवाल आचार्य चाणक्य (Chanakya niti) यांनी केला आहे.

माणसाने प्रत्येक प्राण्याचा एक एक गुण घ्यावा असं चाणक्य सांगतात. आज चाणक्य यांनी सिंह या प्राण्यामध्ये असणाऱ्या गुणांची ओळख करून दिली असून सिंहाचे गुण मानव जातीला कसे फायदेशीर आहेत. हे आचार्य चाणक्य यांनी सांगितलं आहे.

एकाग्रतेनं काम करा

एकाग्रता ही सिंहामध्ये असते. अनेकदा शिकारी करत असताना सिंह हा आपल्या शिकारीवर एकाग्र असतो. त्याला इतर कोणत्याच गोष्टी दिसत नाही. तो इतरही गोष्टींचा विचार करत नाही. म्हणून सिंहाप्रमाणे माणसाने आपल्या ध्येयावर एकाग्र पद्धतीने काम करणं गरजेचं आहे.

कठोर परिश्रम

कठोर परिश्रम हे यश मिळवण्याचं साधन आहे. माणसाने जर मनापासून परिश्रम केले नाहीतर त्याला यश मिळणार नाही. सिंह हा जंगलाचा राजा आहे. त्याने आपली ओळख आपल्या मेहनत आणि कष्टातून निर्माण केली आहे. शिकार करण्यासाठी घेतलेली मेहनत आणि त्याच्या नावाचा दरारा त्याच्या स्वकर्तृत्वावर आहे. त्यासाठी मेहनत आवश्यक असते.

आत्मविश्वासू व्हा

सिंह हा आत्मविश्वासू प्राणी आहे. आत्मविश्वास हा गुण सिंहामध्ये असतो. सिंहाचे धैर्य, रूबाब यामध्येच सिंहाचा आत्मविश्वास लपलेला पाहायला मिळतो. यामुळे सिंहाप्रमाणे मानवाने कामाच्या ठिकाणी नेतृत्वगुण असावं आणि आत्मविश्वास असावा असं चाणक्य सांगतात.

News Title – Chanakya niti Say Learn Things From Lion Become Success

महत्त्वाच्या बातम्या

‘या’ लोकांना होईल आर्थिक लाभ, वाचा आजचं राशीभविष्य

आंबा खात असाल तर आत्ताच व्हा सावध, अन्यथा…

अजित पवार यांचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर!

नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; PF नियमांत झाला मोठा बदल

“2 कोटींची गाडी अन् 17 रूपयांची साडी…,”; बच्चू कडू नवनीत राणांवर संतापले

Join WhatsApp Group

Join Now