‘या’ 4 गोष्टी आयुष्यात कितीही मिळाल्या तरी माणूस समाधानी होत नाही!

On: April 12, 2024 12:23 PM
Chanakya Niti
---Advertisement---

Chanakya Niti | मानवाने आपल्या आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टी अंगीकाराव्यात याबाबतची माहिती आचार्य चाणक्य सांगतात. मानवाच्या आयुष्याला कलाटणी देण्यासाठी आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांच्या चाणक्यनीतीचे (Chanakya Niti) गुण मानवाने जोपासावेत त्याला शंभर टक्के यश मिळते. मानव अनेक गोष्टींपासून संतुष्ट होतो, मात्र अशा काही बाबी आहेत ज्यामुळे मानव जीवनामध्ये कधीच संतुष्ट होत नसल्याचं आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांनी सांगितलंय.

सुख प्राप्ति

सुख प्राप्त करणे हा मानवाच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण घटक आहे. सुख प्राप्तिपासून कोणताच व्यक्ती कंटाळत नाही. फक्त फरक एवढाच असतो की अनेकांचं सुख हे वेगवेगळं असतं. अनेकजण वेगवेगळं सुख उपभोगतात. सुख मिळवण्यापासून कोणताच माणूस थांबणार नाही. त्याला आणखी सुख हवं असतं, तो कधीही सुखापासून संतुष्ट राहत नाही.

चांगलं जीवन

चांगलं जीवन असलं तरीही मानवाला आणखी चांगलं जीवन हवं असतं. जसं की एखाद्या व्यक्तीने चांगलं घर घेतलं की त्याचं चार चाकी गाडी घेण्याकडे कल असतो. ऐश्वर्य, धन-दौलत मानवाच्या जीवनामध्ये असेल तरीही मानवाला आणखी चांगलं जीवन हवं असतं. मानवाला कितीही चांगलं जीवन मिळालं तरीही त्याला चांगल्या जीवनापासून संतुष्ट होता येत नाही. त्याच्या आणखी अपेक्षा वाढतच जातात.

धन दौलत

आचार्य चाणक्य यांनी मनुष्य कधीच धन दौलत आणि संपत्तीपासून संतुष्ट नसल्याचं सांगितलं आहे. जितकं अधिक धन मानवाला मिळेल मानव तोच विचार करतो. यामुळे मानव धनापासून कधीच संतुष्ट राहत नाही. जेवढी कमाई कराल तशा त्याच्या गरजा वाढत जातात तसं त्याला धन कमी पडत जाते असं चाणक्य सांगतात.

पैशांपासून संतुष्ट नाही

पैसा हा मानवाच्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक आहे. पैशांमुळे मानव अनेकदा नातेसंबंध देखील तोडतो. मानवाला आलेला पैसा आयुष्याभरासाठी कमीच पडतो. जसे पैसे येतात. तसाच खर्च देखील होतो. जशा गरजा वाढतात तसा खर्चही वाढतो. म्हणून पैसे कमावणारी व्यक्ती कधीच संतुष्ट नसते.

News Title – Peoples Never Satisfied Of This 4 Points
महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! अभिनेता अक्षय कुमारच्या नावे तरुण मुलीची फसवणूक

अभिनेत्री समंथाने पतीची फसवणूक केली?, घटस्फोटाच्या अडीच वर्षांनी अखेर सत्य समोर

सारानंतर कुणाला डेट करतोय कार्तिक आर्यन?, स्वतःच खुलासा करत म्हणाला…

“…त्यातून हे बाळ जन्माला आलं”, पूजा तडस यांचा मोठा खुलासा, राजकारणात खळबळ

हार्दिक पांड्याच्या भावाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

Join WhatsApp Group

Join Now