अपमानाचा बदला घेण्यासाठी चाणक्य नीतीचा ‘हा’ सर्वात मोठा मार्ग निवडा!

On: February 12, 2026 6:37 PM
Chanakya Niti
---Advertisement---

Chanakya Niti | मानवी आयुष्यात सन्मान आणि आत्मसन्मान यांना खूप मोठं स्थान आहे. अनेकदा काही लोक अपमान गिळून शांत राहतात, पण वारंवार अपमान सहन करणं योग्य आहे का? याबाबत आचार्य चाणक्यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये स्पष्ट मार्गदर्शन केलं आहे.

एकदा सहन केल्यास ज्ञानी, वारंवार सहन केल्यास मूर्ख :

आचार्य चाणक्य म्हणतात, एखाद्याने एकदा अपमान सहन केला तर तो ज्ञानी समजला जातो. दोनदा सहन केल्यास तो महान ठरतो. मात्र जो व्यक्ती सतत अपमान सहन करतो, त्याला मूर्ख म्हटलं जातं. कारण वारंवार अपमान सहन करणं म्हणजे स्वतःच्या आत्मसन्मानाला कमी लेखणं होय.

चाणक्यांच्या मते, जर कोणी सतत तुमचा अपमान करत असेल तर त्याला योग्य वेळी आणि योग्य शब्दांत उत्तर देणं आवश्यक आहे. अन्यथा तुमचं मौन लोक कमकुवतपणा समजू शकतात. मात्र उत्तर देताना रागाच्या भरात प्रतिक्रिया देऊ नये. शांत, संयमी आणि ठाम पद्धतीने दिलेलं उत्तर अधिक प्रभावी ठरतं.

Chanakya Niti | शांततेतून द्या प्रत्युत्तर :

रागाने दिलेलं उत्तर वाद वाढवतं, पण शांत आणि सभ्य वर्तन समोरच्याला त्याची चूक जाणवून देतं. अशा प्रकारे दिलेलं प्रत्युत्तर दीर्घकाळ परिणामकारक ठरतं. पुढील वेळी तो व्यक्ती अपमान करण्यापूर्वी नक्कीच विचार करेल. (Chanakya Niti)

चाणक्य सांगतात की, अपमान मनावर घेऊन खचून जाण्यापेक्षा त्याला प्रेरणा बनवा. स्वतःला इतकं सक्षम आणि यशस्वी बनवा की आज तुमचा अपमान करणारेच उद्या तुमचं कौतुक करतील. यश हीच सर्वात मोठी प्रतिक्रिया असते.

अशा लोकांपासून अंतर ठेवा :

जे लोक नेहमी इतरांचा अपमान करतात, त्यांच्यापासून शक्य तितकं दूर राहणं योग्य. कारण अशा नकारात्मक लोकांचा प्रभाव तुमच्या मानसिक शांततेवर होऊ शकतो.

आचार्य चाणक्यांची ही नीती आजच्या काळातही तितकीच लागू पडते. आत्मसन्मान जपा, संयम ठेवा आणि आपल्या यशातूनच योग्य उत्तर द्या, हीच खरी बदला घेण्याची सर्वोत्तम पद्धत आहे.

News Title : Chanakya Niti: How to Respond to Insult According to Acharya Chanakya

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now