परीक्षेत अफाट यश हवंय?, मग चाणक्याचे ‘हे’ शब्द कायम लक्षात ठेवा

On: February 21, 2024 5:01 PM
Chanakya Niti for students
---Advertisement---

Chanakya Niti | आचार्य चाणक्य यांनी सांगितलेली धोरणे आजही जीवनामध्ये उपयुक्त पडतात.त्यांनी जीवनाच्या प्रत्येक पैलूवर सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलेल्या तत्त्वांचे पालन केले तर कोणत्याही समस्यातून (Chanakya Niti ) बाहेर पडणं अवघड नाहीये. चाणक्य नीती ही सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक तसेच वैयक्तिक जीवनावर खोलवर परिणाम करते.

आज पासून नुकत्याच बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत.तर मार्च महिन्यापासून दहावीच्याही बोर्डाच्या परीक्षा सुरू होणार आहेत.त्यापूर्वी चाणक्य यांनी सांगितलेले धोरणे विद्यार्थ्यांनी जाणून घेतली तर त्यांना भरपूर फायदा मिळेल.चाणक्य नीतीनुसार विद्यार्थी जीवन हे अनमोल आहे. त्यामुळे याचे महत्त्व समजून घ्यायला हवे. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाबाबत गांभीर्याने विचार करायला हवा.

विद्यार्थ्यांसाठी काय सांगते ‘चाणक्य नीती’?

काही सवयींमुळे विद्यार्थी जीवनाचे सर्वाधिक नुकसान होते. विद्यार्थी जीवनातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, जिथे एकदा चूक केली की त्याचा परिणाम हा संपूर्ण आयुष्यावर होत असतो. आता विद्यार्थ्यांना आपले ध्येय कसे साध्य करता येईल,त्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत याबाबत आचार्य चाणक्य (Chanakya Niti ) यांनी काही धोरणे सांगितले आहेत. ही सर्व धोरणे विद्यार्थ्यांनी जाणून घेतली पाहिजेत.

आळस सर्वात मोठा शत्रू

चाणक्य नीतीनुसार विद्यार्थ्यांचा सर्वांत मोठा शत्रू हा आळसच आहे. विद्यार्थ्यांच्या अंगी आळस असला की, ध्येय साध्य करण्यात खूप मोठा अडथळा निर्माण होतो. त्यामुळे विद्यार्थ्याने आळसाला दूर करायला हवे.

वेळेचे नियोजन

विद्यार्थी असो की, इतर कोणीही आयुष्यामध्ये यश संपादित करायचे असेल तर आपल्याकडे वेळेचे नियोजन असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण, वेळ ही कुणासाठीही थांबत नाही. त्यामुळे कोणतीही कामे ही एका निश्चित वेळेत पूर्ण करायला हवीत. हेच आपले ध्येय ठेवणे असे चाणक्य नीति म्हणते.

वाईट संगत टाळा

एक खराब कांदा हा सर्व कांद्यांना खराब करतो असं म्हटलं जातं. हीच पद्धत (Chanakya Niti ) सामाजिक जीवनातही लागू पडते. अर्थातच एक चांगली संगत हे आपलं व्यक्तिमत्व घडवत असते. चाणक्य नीतीनुसार विद्यार्थ्यांनी नेहमी चुकीच्या संगत पासून दूर राहायला हवे. कारण चुकीची संगत ही विद्यार्थ्यांच्या यशात येणारा सर्वात मोठा अडथळा आहे. या वयात मित्रांच्या संगतीचा मोठा प्रभाव आयुष्यावर पडत असतो, त्यामुळे विद्यार्थ्यांनी चांगले आणि खरे मित्रच बनवायला हवेत.

शिस्त बाळगणे

विद्यार्थी जीवनात शिस्त ही अतिशय महत्त्वाची असते. माणसाला एका गोष्टीची शिस्त लागली की तो आयुष्यभर आपली कामे उत्कृष्टपणे करत असतो. शिस्त पाळणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी फारशी धडपड करावी लागत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नेहमीच शिस्त अंगीकारली पाहिजे.

व्यसन करू नये

विद्यार्थी जीवनात व्यसनाला कधीच स्थान (Chanakya Niti ) नसावे. व्यसन हे आयुष्य खराब करत असते. लहान आयुत व्यसनाची सवय लागली तर ती सवय सुटण्यास फार कठीण जाते.व्यसनामुळे विद्यार्थी जीवन खराब होऊन जाते. व्यसनामुळे आपण एका वेगळ्याच मार्गावर भटकत असतो.

व्यसनामुळे ध्येय निश्चिती करण्यास अडथळा येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या व्यसनाच्या जवळ जाऊ नये. या वाईट सवयी यशात अडथळा ठरतात तसेच शरीर , मन आणि संपत्तीचा ही नाश होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना जर यश प्राप्त करायचे असेल, ध्येय साध्य करायचे असेल तर चाणक्य यांनी सांगितलेल्या या धोरणाचे पालन करायलाच हवे. तुम्हाला परीक्षेमध्ये अफाट यश मिळेल.

News Title- Chanakya Niti for students  

महत्त्वाच्या बातम्या –

रेडिओवरचा लोकप्रिय आवाज हरपला! अमीन सयानी यांचं वयाच्या 91 व्या वर्षी निधन

करीना कपूरला बघून सर्वांसमोरच शाहिद कपूरने केलं असं काही की…; पाहा व्हिडिओ

‘सिरियल किसर’ इमरान हाश्मीचा धक्कादायक खुलासा, म्हणाला..

सानिया मिर्झाचं नाव घेताच भडकली सना जावेद, व्हिडीओ तूफान व्हायरल

धोनीनं अन्याय केला, माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी; क्रीडा मंत्र्याचे गंभीर आरोप

Join WhatsApp Group

Join Now