चाकणमध्ये पाणीबाणी, नागरिक त्रस्त! पावसाळ्यातही पाण्यासाठी टँकरवर अवलंबून

On: August 11, 2025 1:05 PM
Pune News
---Advertisement---

Pune Water Supply | पावसाळ्याच्या हंगामात चाकण शहरात पाणीटंचाईचं संकट निर्माण झालं आहे. मागील पाच दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प असून, नागरिकांना पिण्याचे आणि वापराचे पाणी टँकर व बाटलीबंद स्वरूपात विकत घ्यावे लागत आहे. विजेच्या अतिरिक्त दाबामुळे पाणीपुरवठा पंप जळाल्याने ही गंभीर समस्या उद्भवली आहे.

वाढती लोकसंख्या आणि जुनी योजना :

मिळालेल्या माहितीनुसार, पाच दिवसांपूर्वी मुख्य पाणीपुरवठा पंप जळून खाक झाला. स्पेअर म्हणून ठेवलेला पंपसुद्धा खराब झाल्याने नगरपरिषदेपुढे पर्यायी व्यवस्थेचा अभाव निर्माण झाला. परिणामी, शहरात नियमित पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, नागरिकांची टँकरसाठी धावपळ सुरू आहे. (Pune Water Supply)

सध्या चाकणला लागू असलेली पाणीपुरवठा योजना जुनी असून, दररोज सुमारे 7 ते 8 लाख लिटर पाणी पुरवठा केला जातो. मात्र, शहराची लोकसंख्या मागील काही वर्षांत 2-3 लाखांनी वाढल्याने हा पुरवठा अपुरा पडतो. वाढत्या मागणीनुसार पायाभूत सुविधा विकसित न झाल्याने, पंपाचा वीजपुरवठा खंडित होणे किंवा पाइपलाइन फुटणे यामुळे शहरात पाणीटंचाई तीव्र होते.

Pune Water Supply | एक दिवसाआड पाणीपुरवठा :

सध्या शहरात एक दिवसाआडच पाणीपुरवठा केला जात आहे. पावसाळ्यात देखील अशा परिस्थितीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पालिका प्रशासनाच्या पाणीपुरवठा योजनेवरील अवलंबित्वामुळे कोणत्याही तांत्रिक बिघाडाचा थेट परिणाम घराघरातील पाण्यावर होतो. (Pune Water Supply)

भामा आसखेड येथील नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर चाकणमधील पाणीटंचाईची समस्या सुटेल, असा विश्वास मुख्याधिकारी डॉ. अंकुश जाधव यांनी व्यक्त केला आहे. मात्र, तोपर्यंत नागरिकांना टँकर व बाटलीबंद पाण्यावरच अवलंबून राहावे लागणार आहे.

News Title: Chakan Water Crisis 2025: Pump Failure Halts Supply for 5 Days, Citizens Rely on Tankers

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now