पूनम पांडेला नेमका कोणता आजार झाला होता?, मोठी माहिती आली समोर

On: February 2, 2024 2:52 PM
Cervical Cancer Poonam Pandey Death Reason
---Advertisement---

Cervical Cancer | अभिनेत्री पुनम पांडेने (Poonam Pandey) वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी आज (2 फेब्रुवारी) जगाचा निरोप घेतला. गेल्या कित्येक दिवसांपासून ती कर्करोगाशी झुंज देत होती. मात्र, तिची ही झुंज अपयशी ठरली आहे. पुनम पांडेच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट करत तिच्या निधनाचे (Cervical Cancer) वृत्त समोर आलं आहे.

मात्र, पुनमला नेमका कोणता कॅन्सर झाला होता, ती कधीपासून या आजाराने ग्रस्त होती याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. पुनम गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे ग्रस्त होती. याच कॅन्सरवर तिच्यावर उपचार सुरू होते. Cervical Cancer म्हणजेच गर्भाशयाच्या कॅन्सरने तिचा मृत्यू झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Poonam Pandey (@poonampandeyreal)

Cervical Cancer नेमका काय असतो?

महिलांमध्ये या सरव्हायकल कॅन्सरचे  (Cervical Cancer) प्रमाण दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहे. हा स्त्रियांमधील सर्विक्स ह्या अवयवात होणारा कॅन्सर आहे. सर्विक्स म्हणजे गर्भपिशवी आणि योनीला जोडणारा अवयव असतो. भारतामध्ये साधारण 29 % महिला या आजाराने त्रस्त असतात.

हा आजार ह्युमन पॅपीलोमा व्हायरस या विषाणूच्या इन्फेक्शनमुळे होण्याची शक्यता अधीक असते. म्हणजेच योनि, तोंडी किंवा गुदव्दार संभोगाद्वारे एखाद्या व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीमध्ये तो पसरू शकतो. यासोबतच काही इतर कारणांनीही हा आजार होण्याची शक्यता असते.

यात मुख्यतः तीन कारणे प्रमुख असतात. रोगप्रतिकरक शक्ति कमी असणे, पाच वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ  गर्भनिरोधक गोळ्या खाणे आणि 3 पेक्षा अधिक अपत्य असणे. ही तीन कारणे या कॅन्सरला मुख्य कारणीभूत असतात. हा आजार लवकर निदर्शनासही येत नाही. मात्र याची काही लक्षणे असतात, ज्याने लवकर त्यावर उपचार होऊ शकतात.

सरव्हायकल कॅन्सरची लक्षणे-

मासिक पाळीदरम्यान अती रक्तस्त्राव
लैंगिक संभोगानंतर अती रक्तस्त्राव
वजन खूप जास्त कमी होणे
भूक कमी लागणे किंवा भूक लागणेच नाही
मासिक पाळी दरम्यान दुर्गंधी स्त्राव होणे
पायांन सूज येणे यासारखे लक्षणे या आजाराची दिसून येतात.

अभिनेत्री पुनम पांडे (Cervical Cancer) याच आजाराने ग्रस्त होती. त्यामुळे वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी तिचा मृत्यू झाला.  हा आजार भारतात होण्याचे प्रमाण अधिक असल्यानेच काल (1 फेब्रुवारी) केंद्रीय अर्थसंकल्पात याबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पात Cervical Cancer बाबत मोठी घोषणा

आयुष्यमान भारत योजनेमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी सरकारने लसीकरण (Cervical Cancer Free Vaccine) विकसित केले आहे. महिलांनी याची लस मोफत दिली जाणार आहे. या योजनेत कर्करोग आणि किडनीच्या आजारासह अनेक गंभीर आजारवर उपचार केले जातात. या योजनेमध्ये आशा सेविकांचाही समावेश करण्यात आल्याने त्यांना मोठा फायदा मिळणार आहे.

Cervical Cancer चे प्रमाण कमी व्हावे म्हणून  सरकार महिलांना याची मोफत लस देणार आहे. याबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी मोठी घोषणा केली आहे.

News Title- Cervical Cancer Poonam Pandey Death Reason

 महत्त्वाच्या बातम्या –

‘…त्या दोघांपासून जीवाला धोका’; स्वाती मोहोळचा खळबळजनक दावा

पूनम पांडेचा झाला मृत्यू, धक्कादायक कारण आलं समोर

IPL की PSL जगातील सर्वात बेस्ट ट्वेंटी-20 लीग कोणती? Babar Azam चा चाहत्यांसोबत संवाद

बिल्डरांच्या मनमानीला चाप लागणार, सर्वसामान्यांसाठी म्हाडाचा मोठा निर्णय!

“आरक्षण घ्यायची मनोज जरांगे पाटील यांची औकात नाही”

Join WhatsApp Group

Join Now