खुशखबर! होळीपूर्वीच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खिशात येणार जास्तीची सॅलरी

On: February 17, 2026 2:03 PM
Central Government Employees
---Advertisement---

Central Government Employees | होळी सण जवळ येत असताना केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जानेवारी-जून 2026 कालावधीसाठी महागाई भत्त्यात वाढ जाहीर होऊ शकते, अशी चर्चा आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात सरकार याबाबत निर्णय जाहीर करू शकते, ज्याचा थेट परिणाम लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या उत्पन्नावर होणार आहे.

मार्चमध्ये घोषणा; जानेवारीपासून अंमलबजावणी :

गेल्या वर्षी केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग (8th Pay Commission) मंजूर केल्यानंतर केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारकांचे लक्ष आता जानेवारी 2026 पासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्याकडे लागले आहे. परंपरेनुसार जानेवारीचा डीए मार्चमध्ये जाहीर केला जातो आणि तो प्रत्यक्षात जानेवारीपासून लागू केला जातो. त्यामुळे मार्चच्या पगारात दोन महिन्यांची थकबाकी मिळते.

सध्या 31 डिसेंबर 2025 पर्यंत महागाई भत्ता 58 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. जानेवारी 2026 पासून त्यात 2 टक्क्यांची वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. जर हा अंदाज खरा ठरला, तर डीए 60 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. मात्र, अशी वाढ झाली तर मागील 26 वर्षांतील जानेवारी महिन्यातील ही सर्वात कमी वाढ मानली जाईल.

Central Government Employees | लहान वाढही ठरणार फायदेशीर :

जानेवारी 2000 मध्ये केवळ 1 टक्का वाढ झाली होती, तर जानेवारी 2007, 2018 आणि 2025 या वर्षांत 2 टक्के वाढ नोंदवली गेली होती. त्यामुळे 1 ते 2 टक्क्यांची वाढ जरी झाली तरी तिचा परिणाम मोठ्या प्रमाणावर जाणवतो. महागाई भत्त्यातील बदलामुळे केवळ मासिक पगार वाढत नाही, तर थकबाकीची रक्कम आणि पेन्शनमध्येही वाढ होते.

जुलैपासून लागू होणारा डीए साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या सुमारास जाहीर केला जातो. सातवा वेतन आयोग (7th Pay Commission) 31 डिसेंबर 2025 रोजी संपुष्टात आला असून, आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीपूर्वीची ही वाढ महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे होळीच्या पार्श्वभूमीवर होणारी डीएवाढ ही केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक दिलासा देणारी ठरू शकते.

News title : Central Govt DA Hike Before Holi

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now