Big Breaking | औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

On: February 24, 2023 8:35 PM
---Advertisement---

नवी दिल्ली | दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला होता. अखेर याला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे.

औरंगाबाद शहराला अधिकृतपणे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराला धाराशिव असं म्हटलं जाणार आहे. सर्व शासनाच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये तसा उल्लेख केला जाणार आहे.

औरंगाबादमधील प्रत्येक निवडणुकीत नामांतराच्या मुद्द्यावरुन राजकारण पेटायचं. अखेर राज्य सरकारने याबाबत निर्णय काही दिवसांपूर्वी घेतलेला. त्यानंतर आता केंद्र सरकारने देखील नामांतराला मंजुरी दिली आहे.

औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशीव करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली.

दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले.एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याचं चित्र स्पष्ट होताच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या शेवटच्या मंत्रीमंडळ बैठकीत नामांतराबाबतचा प्रस्ताव मंजूर करून घेतला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now