केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! महागाई भत्त्यात ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढ होणार

On: March 18, 2026 12:44 PM
Government Employees
---Advertisement---

DA Hike | देशातील लाखो केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. केंद्र सरकार (Central Government) लवकरच महागाई भत्त्यात वाढ जाहीर करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर हा निर्णय मार्चअखेर किंवा एप्रिलच्या सुरुवातीला जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता असल्याचे संकेत मिळत आहेत. (DA Hike)

महागाई भत्त्यात किती वाढ होणार? :

केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिला जाणारा महागाई भत्ता म्हणजेच डीए (Dearness Allowance) वाढवण्याबाबत लवकरच निर्णय होऊ शकतो. औद्योगिक कामगारांच्या ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार, यावेळी डीएमध्ये सुमारे 2 ते 3 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना 58 टक्के महागाई भत्ता मिळत आहे. मागील वाढ ऑक्टोबर 2025 मध्ये करण्यात आली होती. आता नव्या वाढीनंतर हा भत्ता 60 किंवा 61 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

ही वाढ सातवा वेतन आयोग (Seventh Pay Commission) लागू झाल्यानंतरच्या कालावधीत महत्त्वाची ठरणार आहे. त्याचबरोबर आठवा वेतन आयोग (Eighth Pay Commission) याबाबत चर्चाही सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा विशेष महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांमध्ये या निर्णयाबाबत उत्सुकता वाढली आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो.

DA Hike | पगारात होणार लक्षणीय वाढ :

महागाई भत्त्यातील वाढीचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारावर होणार आहे. उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 18,000 रुपये असल्यास आणि डीएमध्ये 2 टक्के वाढ झाली तर महागाई भत्त्यासह त्यांचे एकूण वेतन अंदाजे 28,800 रुपयांपर्यंत पोहोचू शकते. ही वाढ 3 टक्क्यांपर्यंत झाली तर त्यांचे एकूण वेतन सुमारे 28,980 रुपयांपर्यंत जाऊ शकते.

ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 29,200 रुपये आहे त्यांना महागाई भत्त्यासह अंदाजे 47,012 रुपये वेतन मिळू शकते. नियमानुसार महागाई भत्त्यात वर्षातून दोन वेळा म्हणजे जानेवारी आणि जुलै महिन्यात सुधारणा केली जाते. 2026 मधील ही पहिली वाढ 1 जानेवारी 2026 पासून लागू मानली जाणार आहे. त्यामुळे मागील दोन ते तीन महिन्यांची थकबाकी कर्मचाऱ्यांना एकत्रितपणे मिळण्याची शक्यता आहे. (central government employees)

गेल्या वर्षी 2025 मध्ये 28 मार्च रोजी डीए वाढीची घोषणा करण्यात आली होती. त्याच धर्तीवर यंदाही मार्चच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. काही सूत्रांच्या माहितीनुसार, रामनवमीच्या (Ram Navami) आसपास किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सरकारकडून ही घोषणा केली जाऊ शकते. महागाईपासून संरक्षण मिळावे यासाठी सरकार दरवर्षी अशी वाढ करते. निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई सवलतीत म्हणजेच डीआर (Dearness Relief) मध्येही याच प्रमाणात वाढ होणार असल्याने त्यांनाही या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.

News title : Central Employees DA Hike Update

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now