सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये हजारो जागांसाठी भरती सुरु; या तारखेपर्यंत अर्ज करता येणार

On: March 15, 2024 1:52 PM
Goverment job
---Advertisement---

Central Bank Of India Recruitment 2024 l बँकेत सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) मध्ये शिकाऊ पदाच्या 3 हजार रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 मार्च निश्चित करण्यात आली होती मात्र ती आता 27 मार्च 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. पदवी उत्तीर्ण झालेले आणि या भरतीत सहभागी होऊ इच्छिणारे उमेदवार ऑनलाइन माध्यमातून अर्ज करू शकतात.

Central Bank Of India Recruitment 2024 l पात्रता आणि निकष काय आहेत? :

या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केलेली असावी. याशिवाय उमेदवाराचा जन्म 1 एप्रिल 1996 पूर्वी आणि 31 मार्च 2004 नंतर झालेला नसावा. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयात सूट दिली जाईल. 6 मार्च 2024 ही तारीख लक्षात घेऊन वयाची गणना केली जाईल.

अर्ज फी किती असणार? :

उमेदवारांना अर्ज करण्यासोबतच विहित शुल्कही जमा करावा लागेल. सामान्य, OBC प्रवर्गासाठी 800 रुपये, SC, ST EWS प्रवर्गासाठी 600 रुपये, पीएच उमेदवारांना 400 रुपये आणि महिला उमेदवारांना 600 रुपये शुल्क भरावे लागेल.

इच्छुक उमेदवार अशाप्रकारे अर्ज करता येणार? :

इच्छुक उमेदवार राष्ट्रीय शिकाऊ प्रशिक्षण योजनेच्या (NATS) nats.education.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.

Central Bank Of India Recruitment 2024 l या भरती प्रक्रियेची निवड कशी होईल? :

या भरतीमध्ये निवड होण्यासाठी, उमेदवारांना प्रथम ऑनलाइन लेखी परीक्षा द्यावी लागेल. लेखी परीक्षेनंतर उमेदवारांना मुलाखत आणि स्थानिक भाषा परीक्षेत सहभागी व्हावे लागेल. सर्व टप्प्यांतील यशस्वी उमेदवारांना रिक्त पदांवर नियुक्ती दिली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना प्रति महिना 15 हजार रुपये मानधन दिले जाईल.

News Title : Central Bank Of India Recruitment 2024

महत्त्वाच्या बातम्या –

अभिनेता कार्तिक आर्यनने खरेदी केली नवी कार; किंमत वाचून थक्क व्हाल

वैवाहिक जीवनात सुख शांती हवी असल्यास आमलकी एकादशीला या गोष्टी करा; जाणून घ्या शुभ मुहूर्त

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा मोठा इशारा!

अवघ्या काही तासात सुरु होणार WPL एलिमिनेटर सामना; कुठे व किती वाजता पाहता येणार

नववर्षात होंडा कंपनी ग्राहकांना देणार मोठा धक्का; 1 एप्रिलपासून होणार मोठे बदल

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now