10th exam new rule | राज्यात सध्या दहावीची परीक्षा सुरू झाली असताना विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. परीक्षेच्या वातावरणातच शिक्षण क्षेत्रात मोठा बदल जाहीर करण्यात आला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा पद्धतीत सुधारणा करत आता वर्षातून दोनदा परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. (10th exam new rule)
२० फेब्रुवारीपासून १८ मार्चपर्यंत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) ची दहावीची परीक्षा सुरू आहे. आज पहिल्या पेपरपासून परीक्षेला प्रारंभ झाला असून राज्यभरात उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. यंदा एकूण १६ लाख १५ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. प्रशासनाने परीक्षेसाठी व्यापक तयारी केली असून कॉपी रोखण्यासाठी विशेष भरारी पथके नेमण्यात आली आहेत. काही केंद्रांवर सीसीटीव्हीच्या साहाय्याने देखरेख केली जात आहे. शिक्षण मंडळाने आधीच इशारा देत गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
वर्षातून दोनदा परीक्षा; पहिली संधी बंधनकारक :
दरम्यान, Central Board of Secondary Education ने दहावीच्या परीक्षेबाबत मोठा निर्णय जाहीर केला आहे. बोर्डाच्या नव्या धोरणानुसार आता दहावीची परीक्षा वर्षातून दोन वेळा आयोजित केली जाणार आहे. मात्र, या बदलासोबत काही महत्त्वाचे नियमही स्पष्ट करण्यात आले आहेत. पहिल्या परीक्षेला अनुपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या सत्रात बसण्याची परवानगी मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
याचा अर्थ असा की, पहिली परीक्षा देणे अनिवार्य राहणार आहे. कोणत्याही कारणास्तव गैरहजर राहिल्यास दुसरी संधी उपलब्ध होणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पहिल्या सत्रात उपस्थित राहणे आवश्यक ठरणार आहे. बोर्डाने या नियमाबाबत कोणतीही सवलत देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट शब्दांत सांगितले आहे.
10th exam new rule | गुणसुधारणा संधी आणि ‘Essential Repeat’ नियम :
या नव्या पद्धतीनुसार उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त तीन विषयांमध्ये गुण वाढवण्यासाठी पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. मात्र किमान तीन विषयांची परीक्षा न दिल्यास संबंधित विद्यार्थ्यांना ‘Essential Repeat’ श्रेणीत टाकले जाईल. अशा विद्यार्थ्यांना पुढील वर्षी मुख्य परीक्षेला बसावे लागणार आहे. (10th exam new rule)
बोर्डाने यावर स्पष्ट भूमिका घेत नियमांमध्ये कोणतीही शिथिलता नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नियमांचे काटेकोर पालन करणे भाग पडणार आहे. वर्षातून दोनदा परीक्षा घेण्याचा निर्णय जरी विद्यार्थ्यांसाठी संधी निर्माण करणारा असला, तरी पहिल्या परीक्षेला अनुपस्थित राहणाऱ्यांसाठी पर्याय उपलब्ध नसणार असल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे.






