मोठी बातमी! कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर

On: January 18, 2023 4:29 PM
---Advertisement---

पुणे | पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad) आणि कसबा पेठ (Kasba Peth) विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकांची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

भाजपच्या (Bjp) कसबा पेठच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं कर्करोगानं निधन झाल्यानं दोन्ही जागा रिक्त झाल्या होत्या.

केंद्रीय निवडणूक आयोगानं या जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. या निवडणुकीसाठी मतदान 27 फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजारामुळे 3 जानेवारी रोजी निधन झालं. पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना 3 जानेवारीच्या सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला तसेच भाजप आमदार मुक्ता टिळक यांचही निधन झालं.

मुक्ता टिळक गेल्या अनेक महिन्यांपासून कर्करोगाशी झुंजत होत्या. पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now