‘हा’ शेअर मोठा धमाका करण्याची शक्यता; गुंतणूकदारांची दिवाळी गोड होणार?

On: November 5, 2023 6:07 PM
---Advertisement---

मुंबई | शेअर बाजारात (Share Market) योग्य ठिकाणी गुंतवणूक करणं सर्वात महत्वाचं असतं. त्यासाठी कंपनीचा बाजाराचा अभ्यास आणि तज्ज्ञांचा सल्ला महत्वाचा असतो. कमी भांडवल असलेल्या काही कंपन्यांची झेप थक्क करणारी असते. अशात गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

रिलायन्सच्या शेअर तुमच्याकडे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. रिलायन्सने दुसऱ्या तिमाहीचे निकाल घोषीत केले आहेत. निकालानंतर शेअरमध्ये दोन टक्क्यांची उसळी दिसून आली. शेअरने 2,319 रुपयांपर्यंत झेप घेतली आहे.

अनेक ब्रोकरेज हाऊस या स्टॉक बाबत आग्रही आहेत. त्यांनी रिलायन्सच्या पारड्यात वजन टाकलं आहे. हा शेअर येत्या काळात मोठा पल्ला गाठणार असा अंदाज आहे.लायन्स गुंतवणूकदारांना लवकरच लॉटरी लागण्याची दाट शक्यता आहे. गुंतवणूकदारांची दिवाळी जोरात होण्याची शक्यता आहे.

ग्लोबल ब्रोकरेज हाऊस नोमूराने रिलायन्सचा शेअर 2925 रुपयांच टप्पा गाठण्याचा अंदाज वर्तवला आहे. एचएसबीसीने हा शेअर होल्ड ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

रिलायन्सने 2023 या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत जोरदार कामगिरी दाखवली. या कंपनीचा व्यावसायिक नफा वार्षिक आधारावर चांगला राहिला आहे. उर्वरीत तिमाहीत कंपनी अजून मोठी झेप घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कंपनीचे अनेक प्रोजेक्ट पाईपलाईनमध्ये आहे. ते बाजारात उतरल्यावर मोठा धमका होईल. यावर्षात कंपनीला 16011 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘शेवटी तो माझा भाऊ आहे’; सुप्रिया सुळे थेट बोलल्या

‘तुमचे 50% कुठे…’; नाशिक लाचप्रकरणी धक्कादायक माहिती समोर

“वेळ काळ सांगा मी लढायला तयार”, सुषमा अंधारेंचं ‘या’ नेत्याला थेट चॅलेंज

लोकांची दिवाळी गोड!, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली सर्वात मोठी घोषणा

“आम्हाला जिवंत जाळण्याचा प्लॅन होता”, माजी आमदाराच्या आरोपांनी खळबळ

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now