‘तो हरणारच’; माजी मंत्र्यांनी लावली 9 लाखांची पैज

On: May 1, 2024 9:16 PM
Buldhana Loksabha
---Advertisement---

Buldhana Loksabha | राज्याच्या राजकारणात यंदाची लोकसभा निवडणूक ही अनेक कारणाने चर्चेत राहिली आहे. प्रत्येक मतदारसंघात काही ना काही ट्विस्ट घडताना दिसत आहे. राजकारणात आत्मा, न्यूड सेक्स स्कँडल यावरून विरोधक आमने सामने आले आहेत. मात्र अशातच आता बुलढाणा मतदारसंघात (Buldhana Loksabha)पैजेचं राजकारण पाहायला मिळू लागलं आहे.

एखाद्या मतदारसंघात उमेदवाराचा पराभव होईल की नाही त्यावरून थेट पैज लावलेली आपण पाहिली नसेल ना, पण बुलढाणा मतदारसंघात (Buldhana Loksabha) पाहायला मिळतंय. बुलढाण्याचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांचा पराभव व्हावा यासाठी काहींनी देव पाण्यात ठेवले आहेत. एवढंच नाहीतर बुलढाणा गढ शाबूत राहिला तर माजी मंत्र्यांना सव्वा तीन लाख रुपये मोजावे लागतील. तर विद्यमान खासदाराचा पराभव झाल्यास माजी मंत्र्यांना 10 लाखांचा फायदा होणार असल्याची पैज आता बुलढाणा येथे पाहायला मिळणार आहे. (Buldhana Loksabha)

बुलढाणा मतदारसंघात पैजेचं राजकारण

सुबोध सवाजी जाधव हे आंदोलनासाठी चर्चेत असतात. त्यांनी आता आपल्या मित्रासोबत एक पैज लावली आहे. बुलढाण्यातील उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या पराभवावर ही पैज लावण्यात आली आहे. जर विद्यमान खासदारांचा पराभव न झाल्यास 3.15 लाख रूपये सवाजी यांना द्यावे लागतील. तर विद्यमान खासदाराचा पराभव झाल्यास सवाजी यांना 9.45 लाख रूपये मिळतील. (Buldhana Loksabha)

सुबोध सवाजी जाधव हे त्यांच्या वक्तव्यासाठी आणि आंदोलनासाठी नेहमी चर्चेत असतात. काही वर्षांआधी भाजप नेते राम कदम यांनी मुलींच्या अपहरणावर भाष्य केलं होतं. तेव्हा सुबोध यांनी जर राम कदम यांची जीभ तोडल्यास पाच लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं. (Buldhana Loksabha)

मुंबईतील एका मित्रासोबत लावली पैज

भिडे गुरुजींना अटक करा अन्यथा मी त्यांचा मर्डर करेल असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. प्रतापरावांचा निवडणुकीत पराभव होणार असल्याचा त्यांचा विश्वास आहे. याबाबत त्यांनी आपल्या मुंबईतील एका मित्रासोबत पैज लावली. त्यांनी याबाबतची माहिती सोशल मीडियावर शेअर केली.

बुलढाण्यात मतदान प्रक्रिया पार पडली असून मतदारांचे लक्ष हे 4 जूनला जाहीर होणाऱ्या निकालाकडे आतापासूनच लागलं आहे. आता निकालादिवशी बुलढाण्यातून कोण विजयी होणार? पैज कोण जिंकणार हे पाहणं गरजेचं आहे.

News Title – Buldhana Loksabha In Sawaji Jadhav Challenge To His Friend About Prataprav Jadhav Lose

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हेंना प्रश्नावर प्रश्न, त्याच गावात आढळरावांना लोकशाही मार्गाने प्रश्न विचारायला बंदी

…त्यांची लायकी नाही!, धनंजय मुंडेंचं नाव काढताच शरद पवार भडकले, Video तुफान Viral

दक्षिण मुंबईत भाजपचा पत्ता कट, शिवसेनेच्या ‘या’ नेत्याला मिळालं लोकसभेचं तिकीट

“उज्ज्वल निकम यांना जेलमध्ये पाठवायला हवं…”; किरण मानेंची पोस्ट तूफान व्हायरल

‘कृषीमंत्री असताना पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं?’; मोदींचा पवारांवर पुन्हा हल्लाबोल

Join WhatsApp Group

Join Now