‘या’ देशावर बुआलोई चक्रीवादळाचं महासंकट! हाय अलर्ट जारी, १५ हजार लोकांचं स्थलांतर

On: September 29, 2025 6:05 PM
Maharashtra Rain Alert
---Advertisement---

Bualoi Typhoon | व्हिएतनाम आता एका मोठ्या नैसर्गिक आपत्तीच्या उंबरठ्यावर उभा आहे. अत्यंत धोकादायक ‘बुआलोई’ (Bualoi) चक्रीवादळ वेगाने व्हिएतनामच्या दिशेने सरकत असून, १ ऑक्टोबरला हे वादळ देशाला धडकण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर व्हिएतनाम सरकारने देशभरात ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे. (Bualoi Typhoon Cyclone News)

मुसळधार पावसाची शक्यता :

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुआलोई चक्रीवादळाचा वेग ताशी ११३ किमी एवढा प्रचंड असणार आहे. या काळात देशात तब्बल ६०० मिमी इतका अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुसळधार पावसामुळे नद्यांना महापूर येऊन मोठे नुकसान होण्याची भीती आहे. चक्रीवादळामुळे व्हिएतनामवर अतिवृष्टी, सोसाट्याचा वारा आणि महापूर, असे तिहेरी संकट एकाच वेळी कोसळणार आहे.

Bualoi Typhoon | फिलिपिन्समध्ये घातला होता धुमाकूळ :

हे तेच चक्रीवादळ आहे, ज्याने काही दिवसांपूर्वी फिलिपिन्समध्ये मोठा धुमाकूळ घातला होता. फिलिपिन्समध्ये या वादळामुळे दहा लोकांचा मृत्यू झाला होता, तसेच देशाच्या अनेक भागांत महापूर आला होता. आता हे वादळ दुप्पट वेगाने व्हिएतनामकडे सरकले आहे. (Bualoi Typhoon Cyclone)

प्रशासनाची सज्जता :

संभाव्य धोका असलेल्या भागांमधील १५,००० हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. ज्या भागांत चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे, त्या भागांमध्ये खबरदारी म्हणून हजारो सैनिक तैनात करण्यात आले आहेत. सरकारने मच्छिमारांना समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असे कठोर आदेश दिले आहेत. लोक मोठ्या नुकसानीपासून बचावासाठी स्वतःच्या घराच्या छतांची दुरूस्ती करत आहेत.

पुढील दोन दिवसांत या वादळाचा मोठा तडाखा देशाला बसण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन व्हिएतनामच्या हवामान विभागाने केले आहे.

 

News title : Bualoi Typhoon Cyclone News

Join WhatsApp Group

Join Now