BSNL चा धमाका! अगदी कमी दरात मिळणार 6 महिने कॉलिंग आणि 90GB डेटा

On: May 6, 2025 4:27 PM
BSNL
---Advertisement---

जर तुम्ही दर महिन्याला रिचार्ज करण्याच्या झंझटीपासून मुक्त व्हायचं ठरवलं असेल, तर बीएसएनएलचा (BSNL) नवा प्रीपेड प्लॅन तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. फक्त ₹897 मध्ये तब्बल 180 दिवसांची वैधता, अनलिमिटेड कॉलिंग आणि भरपूर डेटा मिळणार आहे. कमी खर्चात दीर्घ सेवा हवी असेल तर हा प्लॅन नक्की विचारात घ्या. (BSNL Recharge Plan)

180 दिवस अनलिमिटेड कॉलिंग आणि SMS :

बीएसएनएलने (BSNL) सादर केलेल्या 897 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला संपूर्ण भारतात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. एवढंच नाही तर दररोज 100 मोफत SMS देखील या प्लॅनसोबत मिळतात. दररोजच्या मेसेजिंग सेवांचा वापर करणाऱ्यांसाठी हा प्लॅन एक फायदेशीर सौदा ठरतो.

या प्लॅनची आणखी एक खास बाब म्हणजे त्यामध्ये 90GB मोबाईल डेटा मिळतो आणि या डेटावर कोणतीही रोजची मर्यादा नाही. म्हणजे तुम्ही हा डेटा हवं तसं वापरू शकता — एका दिवसात जास्त किंवा हळूहळू 6 महिन्यांत संपवू शकता. इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत ही एक मोठी सवलत मानली जाते. (BSNL Recharge Plan)

BSNL चा स्वस्त आणि टिकाऊ पर्याय :

जिओ, एअरटेल आणि VI सारख्या खासगी कंपन्यांच्या महागड्या प्लॅन्सच्या तुलनेत बीएसएनएलने कमी दरात जास्त व्हॅलिडिटी देत ग्राहकांना आकर्षित केलं आहे. महागडे मासिक रिचार्ज टाळायचे असतील, कमी डेटा वापर करणारे यूजर्स असाल, तर हा प्लॅन तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकतो.

सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने यापूर्वीही अनेक किफायतशीर प्लॅन बाजारात आणले आहेत. या प्लॅनमुळे दर महिन्याचा खर्च कमी होतो आणि सेवा दीर्घकाळासाठी उपलब्ध राहते. सध्या बाजारात असलेले एकमेव 6 महिन्यांचे फायदेशीर प्रीपेड पॅक म्हणून याकडे पाहिले जात आहे.

कोणासाठी योग्य? :

जे युजर्स मुख्यतः कॉलिंग आणि SMS साठी सिम वापरतात आणि दररोज जास्त डेटा लागत नाही, त्यांच्यासाठी हा प्लॅन परफेक्ट आहे. तुम्ही ऑफिससाठी किंवा सेकंडरी सिमसाठी वापरत असाल, तरही हा प्लॅन योग्य पर्याय ठरतो.

News Title: BSNL ₹897 Plan: 6-Month Validity With 90GB Data

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now