पुणे हादरले! सैराट स्टाईलने तरुणाचा गेम, धक्कादायक हत्याकांडाने शहरात खळबळ

On: March 17, 2026 12:22 PM
Pune Crime News
---Advertisement---

Pune Crime News | विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात (Pune) पुन्हा एकदा धक्कादायक गुन्हा घडला आहे. प्रेमसंबंधाच्या पार्श्वभूमीवर एका तरुणाची अत्यंत निर्दयी पद्धतीने हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. कोथरूड (Kothrud) परिसरात घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी काही आरोपींना अटक केली आहे.

प्रेयसीला भेटायला गेला आणि जीव गमावला :

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागेश जाधव (Nagesh Jadhav) असे मृत तरुणाचे नाव असून तो गोखले नगर वडारवाडी परिसरात राहणारा होता. नागेशचे एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती पुढे आली आहे. संबंधित मुलीने मोबाईलवरून संपर्क साधत नागेशला भेटण्यासाठी बोलावल्याचे सांगितले जात आहे. तिच्या बोलावण्यावरून तो कोथरूड परिसरात गेला. (kothrud murder case)

मात्र त्याला भेटायला गेल्यानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली. मुलीच्या कुटुंबीयांनी नागेशला घराच्या टेरेसवर नेल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याच्यावर लाकडी दांडक्यांनी तसेच लाथाबुक्क्यांनी जोरदार मारहाण करण्यात आली. या वेळी नागेशच्या अंगावर कपडेही नव्हते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. झालेल्या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ माजली असून नागेशच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त करत सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

Pune Crime News | पोलिसांची कारवाई आणि पुढील तपास :

या प्रकरणी कोथरूड पोलिस स्टेशन (Kothrud Police Station) येथे एकूण 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत सहा आरोपींना अटक केली असून उर्वरित चार जणांचा शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये पाच महिलांचा आणि एका पुरुषाचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, नागेश वारंवार त्या मुलीला भेटण्यासाठी येत असल्यामुळे तिच्या नातेवाईकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. त्यातूनच हा वाद वाढत गेला आणि अखेर त्याच्यावर हल्ला करण्यात आला. ही घटना रात्रीच्या सुमारास घडल्याचे सांगितले जात आहे. नागेशचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला आणि त्याच्या शरीरावर झालेल्या जखमांचे स्वरूप काय आहे, याबाबत स्पष्ट माहिती पोस्टमार्टम (Postmortem) अहवाल आल्यानंतरच समोर येणार आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास तांत्रिक पुरावे आणि साक्षीदारांच्या मदतीने करत आहेत.

News title : Brutal Murder Over Love Affair Pune

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now